Raju Srivastava: कॉमेडिअन राजू श्रीवास्तव यांचा जवळपास ४० दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात जीवन मृत्यूचा संघर्ष सुरू होता. अखेर आज २१ सप्टेंबर रोजी बुधवारी त्यांचं निधन झालं. ते मागील कित्येक दिवसांपासून कोमामध्ये होते. १० ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यावेळी त्यांना एम्समध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांच्या उपचारादरम्यान बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांचे काही डायलॉग्स ऐकवण्यात येत होते, जेणेकरुन त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होऊ शकेल. राजू यांच्या बाजूला अमिताभ बच्चन यांचा आवाज लावण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांना राजू श्रीवास्तव देवच मानायचे. बॉलिवूडचे इतके कलाकार असताना, केवळ अमिताभ बच्चन यांचा आवाजच राजू यांना का ऐवण्यात आला होता, यामागे कारणही तसंच आहे.

रुग्णालयात बिग बींनी पाठवला होता खास ऑडिओ मेसेज

राजू श्रीवास्तव ज्यावेळी कोमामध्ये होते, त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे आवडते अभिनेते आणि त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी देणारे, वेगळी ओळख देणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स ऐकवले होते. बिग बींनी राजू यांच्यासाठी एक ऑडिओ मेसेजही त्यांच्या कुटुंबियांकडे दिला होता. या मेसेजमध्ये त्यांनी म्हटलं, होतं की ‘राजू उठ, आता बस झालं, अजून तुला खूप काम करायचं आहे…आता उठ आणि आम्हाला सर्वांना पुन्हा हसायला शिकव’. हा मेसेज राजू यांना रुग्णालयात अनेकदा ऐकवण्यात आला होता.

इतर अवयव काम करत होते, पण ब्रेन काम करत नव्हतं

१६ आणि १७ ऑगस्टच्या मध्यरात्री राजू श्रीवास्तव यांच्या डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं होतं. या रिपोर्टमध्ये त्यांच्या डोक्यात पाणी भरलं असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ते कोमामध्ये गेले. एम्स डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांच्या हृदयासह त्यांच्या शरीराचे इतर अवयव काम करत होते, केवळ ब्रेन योग्यरित्या काम करत नव्हतं. त्यांच्या शरीरात झालेलं संक्रमणही ठीक झालं होतं. अनेक प्रयत्न करुनही अखेर ४० दिवसांचा त्यांचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष अपयशी ठरला. हेही वाचा – १२ वर्षांनंतर राजू श्रीवास्तव यांना मिळालं होतं खरं प्रेम, शिखासाठी करावा लागला संघर्ष

बिग बी खास असण्यामागे काय होतं कारण?

एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात राजू श्रीवास्तव यांनी स्वत:चं अमिताभ बच्चन यांचं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे याबाबत सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं, की ज्यावेळी ते कॉमेडी करत होते, त्यावेळी अमिताभ बच्चन सुपरस्टार होते. इतर कोणीही त्यांची मिमिक्री करत नव्हतं. ते एकटेच त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांच्या डायलॉग्सची मिमिक्री करत होते. या बिग बींच्या डायलॉग्सची मिमिक्री करुनच त्यावेळी त्यांना पैसे मिळत होते. हेही वाचा – कोमात गेल्यावर काय होतं, काहीसे असे होते राजू श्रीवास्तव यांचे शेवटचे ४० दिवस

अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्रीतूनच मिळत होते पैसे

ज्यावेळी ते मुंबईत आले, त्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे काम नव्हतं. ते अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपटांचे डायलॉग्स पाठ करुन कॉमेडी शोच्या मंचावरुन त्याची मिमिक्री करत होते. प्रेक्षक त्यांच्या मिमिक्रीची मोठी प्रशंसाही करायचे आणि त्यातूनच त्यांना पैसेही (Raju Shrivastav Amitabh Bachchan) मिळायचे. त्यांचं घरही त्या पैशांवरच चालत होतं. पुढे अनेक वर्ष ते अमिताभ बच्चन यांच्या डायलॉग्सची मिमिक्री कॉमेडी शोच्या मंचावरुन करत होते.

बिग बींमुळे मिळाली वेगळी ओळख

राजू यांनी टेलिव्हिजनवरील शोमध्ये स्वत: सांगितलं, की बिग बींमुळेच त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आणि त्यामुळेच पुढे कामही मिळालं. कित्येक वर्ष बिग बींची मिमिक्री करत होतो, असंही ते म्हणाले. एका मोठ्या कालावधीनंतर त्यांनी इतर अभिनेत्यांच्या आवाजाची मिमिक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे गजोधर भैया, मिश्रा पांडे अशी इतर पात्र त्यांनी उभारली. त्यांच्या या पात्रांनाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आणि ही पात्र अजरामर झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.