मुंबई: शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ आणि भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना मरणोपरांत पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्राकडून देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, ज्यात स्वर्गीय राकेश झुनझुनवाला यांचाही समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित येईल. झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांनी अवघ्या ५ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने हजारो कोटींची संपत्ती निर्माण केली.

शेअर बाजाराच्या दुनियेत एन्ट्री
राकेश झुनझुनवला यांच्या यशाची कहाणी अवघ्या पाच हजार रुपायांनी सुरु झाली आणि आपल्या मागे ते हजार कोटींची संपत्ती सोडून गेले. आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेत १९८५ मध्ये झुनझुनवला पहिल्यांदा शेअर बाजारात उतरले. पण जेव्हा त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे ठरवले तेव्हा त्याच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. तर त्यांनी आपल्या कोणत्याही मित्राकडून पैसे घेण्याचा प्रयत्नही करू नये, अशीही ताकीद दिली. वडिलांनी झुनझुनवालाला सांगितले की, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी स्वत:च्या मेहनतीने पैसे कमवायचे.

राकेश यांचे वडील राधेश्याम झुनझुनवाला आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते देखील अनेकदा शेअर बाजारात पैसे गुंतवायचे आणि त्यांना पाहूनच ‘बिग बुल’ही शेअर बाजारात गुंतवणूकीचा मोह आवरू शकले नाही.

गुंतवणुकीसाठी पैसे कसे मिळाले?
झुनझुनवाला यांच्या वडिलांनी पैसे देण्यास आणि कोणाकडून कर्ज घेण्यास नकार दिला असताना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पैसे कोठून आणले?, असा प्रश्न उपस्थित होतो. या दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या भावाच्या एका ग्राहकाशी संपर्क साधला आणि मोठा नफा मिळवून देण्याचे सांगून पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले. तेच पाच हजार रुपये त्यांनी मध्ये शेअर बाजारात गुंतवले आणि यशाची पायरी चढण्यास सुरुवात केली. झुनझुनवाला यांनी पाच हजार रुपयांच्या गुंतवणूकीने पहिल्या यशाची चव चाखली.

टाटांच्या शेअरने मालामाल
राकेश झुनझुनवाला एक चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होते आणि पाच हजार रुपयाची गुंतवणूक गुंतवणूकदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. एकेकाळी त्यांनी टाटा टी, या टाटा समूहाच्या कंपनीचे पाच हजार शेअर्स ४३ रुपयांत विकत घेतले. तीन महिन्यांत टाटा चहाचा स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली. त्यानंतर झुनझुनवाला यांनी हा शेअर १४३ रुपयांना विकला. या निर्णयामुळे झुनझुनवाला यांना तीन महिन्यांत २.१५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच लाख रुपयांचा नफा झाला.

टाटांचा वाटा किती मोठा?
काही निवड शेअर्सवर डाव लावून झुनझुनवाला यांनी अवघ्या तीन वर्षांत करोडपतींच्या यादीत स्थान मिळवले, पण तट समूहाच्या शेअर्सने पुन्हा एकदा त्यांचे नशीब बदलले. त्यांनी २००३ मध्ये टाटा समूहाच्या टायटनमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी टायटनचे सहा कोटी शेअर्स अवघ्या ३ रुपये प्रति शेअर दराने खरेदी केले, ज्याने काही काळानंतर ७००० कोटी रुपयांचा परतावा दिला. गेल्या वर्षी झुनझुनवालांची एकूण संपत्ती २२ हजार कोटींच्या आसपास होती. याशिवाय आपल्या निधनापूर्वीच त्यांनी सुमारे ५० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीसह अकासा एअरलाइनची देखील स्थापना केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *