नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील दुसरा सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण आशिया चषकातील या भारत आणि पाकिस्तानच्या सुपर ४ सामन्यासाठीच फक्त राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण फक्त या एकाच सामन्यासाठी राखीव दिवस का ठेवण्यात आला आहे, याचे खरे कारण आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील पहिला सामना हा २ सप्टेंबरला खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताची फलंदाजी होती आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पण भारताची फलंदाजी संपली आणि त्यानंतर जोरदार पाऊस आला. या जोरदार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. पण त्यानंतरही भारतीय संघ सुपर ४ मध्ये पोहोचला. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा १० सप्टेंबरला लढत होणार आहे. पण आशिया कपचे या सामन्यासाठी नियम बदलले. कारण फक्त या एकाच सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. पण फक्त या एका सामन्यासाठीच का राखीव दिवस आहे, याचे कारणही आता समोर आले आहे. खरं तर आतापर्यंच्या आशिया चषकातील सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जर आशिया चषकाची प्रसिद्धी करायची असेल तर त्यासाठी भारत आणि पाकिस्तान सामन्यासारखा पर्याय नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान या सामन्यातून मोठ्या प्रमाणात अर्थाजन होत असते आणि या गोष्टीचा फायदा यजमान देशाला होत असतो. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान सामन्याला राखीव दिवस ठेवला तर यजमान पाकिस्तानला जास्त पैसे मिळवता येऊ शकतात. कारण आतापर्यंतच्या आशिया कपच्या सामन्यांकडे चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. पण या सामन्यासाठी चांगली तिकिट विक्री झाली आहे. त्याचबरोबर जर राखीव दिवस ठेवण्यात आला आणि या दिवशी सामना झाला तर प्रसारणाच्या माध्यमातूही मोठी कमाई होऊ शकते. त्यामुळे आशिया कपमधून चांगली कमाई व्हावी, हा एकच उद्देश फक्त भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या राखीव दिवसातून दिसत आहे. फक्त या भारत व पाकिस्तान या एकाच सामन्यासाठी राखीव दिवस का आणि श्रीलंका व बांगलादेशच्या सामन्यांसाठी का नाही, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे, तर त्याचे हे एकमेव उत्तर आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जर राखीव दिवशी झाला तर टीम इंडियला सलग तीन दिवस मैदानात उतरावे लागणार आहे. कारण १० सप्टेंबरला भारताचा सामना आहे, ११ सप्टेंबरला राखीव दिवस असेल तर १२ सप्टेंबरला भारताचा श्रीलंकेबरोबर सामना आहे. त्यामुळे हा सामना जर राखीव दिवशी गेला तर सलग तीन दिवस भारताला मैदानात उतरावे लागू शकते.