मुंबई : जी गोष्ट सलमान खाननं कधीही कुणासमोर कबूल केली नाही. तिच गोष्ट बॉलिवूडची ड्राम क्विन राखी सावंत हिनं खुलेआमपणं सांगितलं आहे. राखी सावंत ही अत्यंत बोल्ड, बिन्धास्त आणि तिच्या नखऱ्यांसाठी ओळखली जाते. राखी सावंत बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती.तिच्या आक्रस्ताळेपणाचे अनेकजण चाहते आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. राखी देखील तिच्या चाहत्यांसाठी अनेक अतरंगी गोष्टी करताना दिसते.अशा या ड्रामाक्विनचा आज वाढदिवस.

राखीनं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका अभिनेत्रीबरोबर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं सलमान खानला टॅग केलं आहे. तसंच व्हिडिओ शेअर करताना तिनं आमची लाडकी वहिनी असं म्हटलं आहे.

कोणाबरोबर केला राखीनं डान्स

ही पार्टी राखीच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केली होती. त्यामध्ये राखी आणि तिच्या बॉयफ्रेंडसह आलेले पाहुणे लॉनवर पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. पार्टी सुरू असताना राखी डान्स करायला सुरुवात करते. डान्स करता करता राखी सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिच्या हाताला धरून उठवते आणि स्वतःबरोबर तिला डान्स करायला लावते. त्या थिरकू लागतात. राखीनं हाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना राखीनं सलमान खान याला टॅग केलं आहे. तसंच व्हिडिओबरोबर लिहिलेल्या पोस्टमध्ये युलियाला स्वीटहार्ट वहिनी असं म्हटलं आहे.

सलमान आणि त्याची नवी गर्लफ्रेंड युलिया वंतूर यांच्या रिलेशनशिपविषयी अनेकांना माहिती आहे. त्यांच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले आहेत. मात्र सलमाननं जाहीरपणे त्याविषयी कधीही वक्तव्य केले नाही. यासगळयात राखीच्या पोस्टमुळे हे दोघं रिलेशनमध्ये होते हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, राखी आणि सलमानचं नातं हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. भलेही सलमाननं जाहीरपणं राखीची फिरकी घेतली तरी तो तिच्या मदतीलाही बऱ्याचदा धावून गेला आहे. राखीच्या आईवर जेव्हा शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा त्यानं मदत केली होती. राखीला देखील सलमानविषयी खूप आदर आहे. ती त्याला भाऊ मानते. तिच्याविषयी कुणी काही बोललं तर त्याविरोधात लढतेही. कंगनानं जेव्हा सलमानवर टीका केली होती तेव्हा राखी ही एकमेव सेलिब्रेटी होती जिनं सलमानच्या बाजुनं प्रतिक्रिया दिली होती. आताही राखीनं सलमानच्या बाबत एका वेगळया गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *