धुळे : शहरातील साक्री रोड परिसरातील मिलिंद सोसायटीत राहणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष यशवंत बागुल यांची नुकतीच हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. यशवंत बागुल यांच्या सख्ख्या मामाची दोन्ही मुलेच मारेकरी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गुरूवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमाराला हा खून झाला होता. कुटुंबातील महिलांना तसेच मामाच्या मुलांना मानसिक त्रास देत असल्याचे कारण या खुनामागे असल्याचे पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पंकज राजेंद्र मोहिते आणि आनंद लक्ष्मण मोहिते (दोन्ही रा. उभंड नांद्रे, ता. धुळे) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहेत. त्यापैकी पंकज मोहिते हा यशवंत बागुल याच्या दुचाकीवर बसूनच उभंड येथून पिंपरखेड गावाला मजुरांच्या शोधासाठी गेला होता. तेथून परत येत असताना पिंपरखेड घाटात आधीच आनंद मोहिते हा ठरल्यानुसार रस्त्यात थांबला होता. रस्त्यात थांबलेल्या आनंद मोहितेने यशवंत बागुल यांना थांबवून गप्पा मारण्याचे नाटक केले आणि त्यानंतर दोन्ही भावांनी गावठी पिस्तूल आणि चाकूच्या साहाय्याने यशवंत बागुल यांच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.दरम्यान, यशवंत बागुल यांची पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत होते. दोन्ही संशयितांना पोलिसांनी कालच ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवतात दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *