मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) आज ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त जगभरातील सामान्य नागरिकांपासून विविध मान्यवरांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही खास पोस्ट करत पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये अभिनेत्री कंगना रणौत हिची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कंगनाने पंतप्रधानांची तुलना महान व्यक्तींशी करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.

कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींनी तिला यावरुन ट्रोल केलं आहे, तर काहींनी तिच्या बोलण्याचं समर्थन केलं आहे. कंगनाने मोदींसोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हे वाचा-उर्मिला मातोंडकरचं ८ वर्षांनी मराठी सिनेमात कमबॅक,श्रेयस तळपदेबरोबर रंगणार जुगलबंदी!

कंगनाने राम-कृष्ण-गांधींशी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना

अभिनेत्रीने पंतप्रधानांना खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टमध्ये असं म्हटलं की, ‘लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या पृथ्वीवरील शक्तिशाली व्यक्तिमत्त्व बनण्यापर्यंत तुमचा प्रवास अविश्वसनीय आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. श्रीरामांप्रमाणे, श्रीकृष्णाप्रमाणे आणि गांधींप्रमाणे तुम्ही अमर आहात. तुम्ही राष्ट्र आणि त्यापलीकडेही मनात कोरले गेले आहात, तुम्ही दीर्घायुष्य जगाल. तुमचा वारसा कुणीही मिटवू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला ‘अवतार’ म्हणते. तुमच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे.’

Kangana Ranaut with Narendra Modi

कंगना २०१८ साली गीतकार प्रसून जोशी यांच्यासमवेत पंतप्रधानांना (Actress Kangana Ranaut Meet PM Narendra Modi) भेटली होती. त्यावेळचा हा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. कंगनाव्यतिरिक्त बॉलिवूडमधील विविध कलाकारांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचा-अमेरिकन मीडियाची RRRसाठी भविष्यवाणी, राम चरणचे चाहते झाले खूश

दरम्यान अभिनेत्री कंगना काही दिवसांपूर्वी तिने ‘बीफ’संदर्भात केलेल्या जुन्या ट्वीटमुळे चर्चेत आली होती. ‘ब्रह्मास्त्र’ रीलिजआधी रणबीर कपूरचा बीफबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंगनाचेही बीफ संदर्भातील वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रणबीरसोबत अभिनेत्रीलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ या सिनेमात दिसणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना दिसेल. तिच्यासह या सिनेमात श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी अशी तगडी स्टारकास्ट आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.