मुंबई : दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. त्यावर खुद्द रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी ठाकरेंबद्दल तसं बोलायला नको होतं, मी माझे शब्द मागे घेतो, असं रामदास कदम म्हणाले. मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा दावाही कदमांनी केला. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत, त्याआधीच रामदास कदमांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसते.

रामदास कदमांची प्रतिक्रिया काय?

रश्मी ठाकरेंबद्दल मी तसं बोलायला नको होतं, मी माझे शब्द मागे घेतो, मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी वास्तव ते बोललो, ठाकरेंचा अपमान होईल असं काही बोललो नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, अशी प्रतिक्रिया रामदास कदम ‘टीव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

सुषमा अंधारे कोण? मी ओळखत नाही, असा टोला लगावताना आंदोलनांना मी घाबरत नाही, असंही कदम म्हणाले. तीन वर्ष माझं तोंड बंद केलं, माझ्या मुलाला त्रास दिला, आमचा काय गुन्हा? असा सवालही रामदास कदम यांनी विचारला.

रामदास कदम काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे? तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्व आहे की नाही? असा सवाल रामदास कदम यांनी केला होता.

हेही वाचा : तेजस ठाकरेंच्या लाँचिंगवर ‘आदित्य दादा’ची प्रतिक्रिया, उत्तर देताना ठाकरे स्टाईल पंच मारलाच

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले आहेत. इतर वेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.

कदमांच्या वक्तव्यानंतर कुठे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. तर कुठे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. शिवसेना नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

हेही वाचा : माजी नगरसेवकाचा ‘वर्षा’वर शिंदे गटात प्रवेश, पण नाशिकला परतण्यापूर्वीच मोठा हादराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.