मुंबई :रंग माझा वेगळा मालिकेत अनेक दिवस कोर्टातले सीन सुरू होते. दीपिकाचा ताबा कायम कार्तिककडे राहावा, म्हणून आयेशा दीपाला सतत संकटात पाडत होती. कोर्टातही हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. दीपाच्या चारित्र्यावर वकिलांनी आरोप केल्यानंतर कार्तिक दीपाच्या बाजूनं भांडला.

याचा परिणाम वेगळाच झाला. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पुढच्या भागाचा आहे. त्यात कोर्टानं दीपा, कार्तिक आणि दोन्ही मुली यांना एकत्र राहायला सांगितलंय. दीपा याला तयार होते. तसा कार्तिकही. पण हे कळल्यावर आयेशा कार्तिकच्या अंगावर ओरडते. ती म्हणते, याचा अर्थ तुझ्याही मनात अजून दीपाच आहे.

आम्ही अजूनही आहोत अंड्यातच, असं का म्हणतोय कुशल बद्रिके?

इकडे सौंदर्या आणि कार्तिकच्या वडिलांना आनंद होतो. त्यांना हेच हवं होतं. तसंच प्रेक्षकांनाही. आता कार्तिकला कधी कळणार की या दोन्ही मुली त्याच्याच आहेत, याची प्रेक्षक वाट पहात आहेत. पण आता पुढचा भाग रंगतदार होणार, हे नक्की.

दीपाच्या घरी गणपती होता. पूजा कोण करणार, या प्रश्नाला दोघी मुलीच उत्तर देतात. त्या म्हणतात आई आणि बाबा. आता दीपा-कार्तिककडे दुसरा पर्याय नसतो. मुलींना खूश ठेवण्यासाठी का होईन दोघं पूजेला तयार होतात. तिकडे आयेशाला हे कळल्यावर ती बराच आकांडतांडव करते. कार्तिक तिला समजावतो.

Video : रणबीरला पाहून गर्दी अनावर, मग अभिनेताच पाहा कसा मदतीला सरसावला

मालिकेतला रेनकोट सीनही गाजला. कार्तिकी आणि दीपिका शाळेबाहेर एका रेनकोटात अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तितक्यात कार्तिकची कार तिथे येते. मुलींची ही परिस्थिती पाहून तो दीपिकाला नवा रेनकोट देतो. दुसऱ्या दृश्यात दीपा दीपिकाला म्हणते, मी तुला नवा रेनकोट आणून देते. पण दीपा नाही म्हणते. उशीखाली ठेवलेला रेनकोट ती काढून आईच्या हातात देते.

मालवणी भाषा बोलणाऱ्यांना बाहेर किंमत नाही, असं सांगितलं जायचं | नम्रता पावसकरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.