शहरात रंगला लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रम:आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनतर्फे उपक्रमाचे आयोजन
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील सर्व प्रभागात, भिंगार शहरात व बुरुडगाव येथे महिलांसाठी ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारपासून (२८ सप्टेंबर) शहरात या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. सावेडीत प्रभाग एक व प्रभाग सातपासून लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्या विजेत्या महिलेस सुझुकी ॲक्सेस आणि ११ हजार रुपयांची पैठणी, द्वितीयसाठी फ्रीज आणि पैठणी, तृतीयसाठी पैठणी व टीव्ही, सात उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी पैठणी व स्मार्ट वॉच अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. नवरोत्रोत्सवात फराळाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दरम्यान, विजेत्या महिलांसाठी मोफत लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. यात विजेत्या महिलांना फ्रिज, ३२ इंच टीव्ही, वॉशिंग मशिन, स्मार्टफोट, कुलर, गॅस शेगडी, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्युम क्लीनर, आटा चक्की, मिक्सर, ग्राइंडर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.