नाश्ता (breakfast) हा दिवसभरातील सर्वात महत्त्वपूर्ण आहार आहे. सर्व डॉक्टर्स आणि हेल्थ एक्सपर्ट्स सुद्धा नाश्ता वेळेवर करण्याचे आणि स्किप न करण्याचे फायदे सांगतात. एक हेल्दी नाश्ता नक्कीच पूर्ण दिवस शरीरात उर्जा टिकून राहावी आणि शरीर निरोगी रहावे म्हणून गरजेचा असतो. पण तुम्हाला माहित आहे का त्या सोबतच दुपारचं आणि रात्रीचं जेवण देखील खूप महत्त्वाचं आहे. चिंतेची गोष्ट अशी आहे की लोक नाश्ता हा हलक्यात घेतात, त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा स्किप करतात आणि ती तूट भरून काढण्यासाठी रात्री अगदी पोट फुटेपर्यंत जेवतात.

काही लोकांचा गैरसमज असतो की संध्याकाळी 7 नंतर काहीही खाल्ले तर वजन वाढते आणि म्हणून ते जेवणच सोडून देतात. पण असे करणे चुकीचे आहे. कारण निरोगी व दीर्घायुषी जगण्यासाठी रात्रीचं जेवणंही तितकंच गरजेचं असतं जितका नाश्ता. रात्री जास्त खाणे किंवा अजिबातच न खाणे या दोन्ही चुकीच्या गोष्टी आहेत. शिवाय तुम्ही रात्री काय खाता यावर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

रात्री काय खाऊ नये?

आयुर्वेदाच्या डॉक्टर रेखा राधामणी यांच्या म्हणण्यानुसार, काही लोक रात्री जेवणात मांस, चिकन, दही आणि पराठे यांसारख्या पदार्थांचे जेवण करतात. पण मुळात असे करणे चूक आहे. आयुर्वेदिक जाणकारांसह अन्य डाइट एक्सपर्ट्स सह खूप काळापासून हीच गोष्ट सांगत आहे की रात्रीचा आहार हा सकस आणि हलका असायला हवा. आज आपण जाणून घेऊया की आयुर्वेदानुसार रात्रीच्या आजारात कोणते पदार्थ खाणे अयोग्य आहे. कारण हे पदार्थ खाल्ल्याने कफ दोष मध्ये असंतुलन निर्माण होते.

(वाचा :- Abdominal TB symptoms : सावधान, फुफ्फुसांपासून आतड्यांपर्यंत पसरलेला असू शकतो टीबी, ही 8 लक्षणं धोक्याचा इशारा)

गहू

आयुर्वेदामध्ये गहू हा पदार्थ भारी म्हणजेच जड समजला गेला आहे. कारण हा पदार्थ पचायला खूप वेळ जातो. म्हणूनच आयुर्वेद म्हणते की रात्रीच्या वेळी गहू नि त्यापासून तयार झालेले अन्न पदार्थ खाणे टाळावे. जर तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर शरीरात आम्ल म्हणजे विषाक्त वाढू शकते आणि पचन तंत्र प्रभावीत होऊ शकते. तर मंडळी तुम्ही रात्रीच्या अहार्त गहू किंवा तत्सम पदार्थ खात असाल तर आताच सावध व्हा.

(वाचा :- किचनमधील हा 1 मसाला कधीच वाढू देत नाही रक्तातील साखर, डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने खा, डायबिटीजचा धोका टळेल)

दही

नेहमीच असे आढळते की अनेक लोक रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन करतात. आयुर्वेदाच्या नुसार दही हे कफ आणि पित्त वाढवते. याचा अर्थ असा आहे की याचे सेवन केल्याने तुम्हाला खोकला, घसा खवखवणे, गळा दुखणे यांसारख्या समस्या सतावू शकतात. पण हा दह्या ऐवजी रात्रीच्या आहारात किंवा नंतर ताक पिणे उत्तम मानले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात हा बदल करून पहायला हरकत नाही.

(वाचा :- या 5 प्रकारच्या लोकांसाठी हळद आहे विषारी, शरीरातील संपूर्ण रक्त जाईल आटून व लिव्हर सुद्धा येईल प्रचंड धोक्यात.!)

मैद्याचे पदार्थ

आयुर्वेदात मैदा म्हणजे गोड विष आहे असे म्हटले गेले आहे. याचे कारण म्हणजे यामध्ये फायबर नसते आणि मैदा जर तुम्ही अधिक प्रमाणात सेवन केला तर तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन, अतिसार यांसारख्या समस्या सतावू शकतात. शिवाय रात्रीच्या आहारात मैद्याचे सेवन केल्यास मैदा पचायला देखील जड जातो. म्हणून तुम्ही जर असा काही आहार रात्रीच्या वेळी करत असाल तर विचार करूनच हे पदार्थ खा.

(वाचा :- 72 वर्षांचे नरेंद्र मोदी 24 तास काम करण्याइतके फिट कसे? या 5 गोष्टी त्यांच्या एनर्जीला धक्काही लागू देत नाहीत..)

गोड पदार्थ

असे अनेक लोक असतात ज्यांना आहार झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते, अर्थात तशी त्यांना सवय असते. मग अशावेळी सहसा चॉकलेट किंवा डेझर्टला प्राधान्य दिले जाते. तुम्हाला सुद्धा कदाचित अशी सवय असू शकते आणि अशी सवय असेल तर वेळीच ही सवय रोखलेली बरी कारण हे गोड पदार्थ हेवी असतात आणि शरीराला ते पचायला जड जातात. त्यामुळे खास कार्यन रात्रीच्या वेळी जेवून झाल्यावर असे पदार्थ खाणे टाळावे असे आयुर्वेद सांगते.

(वाचा :- पोट साफ न होणं, मुळव्याध, शौचाच्या जागेची जखम, बद्धकोष्ठतेसाठी अमृत आहे डॉक्टरांचे हे 5 उपाय, झटक्यात व्हाल बरे)

कच्चे सॅलेड

सॅलड आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात काही शंकाच नाही. पण रात्री ते खाणे कटाक्षाने टाळावे. सॅलेड हे थंड आणि कोरडे असते ज्यामुळे वात वाढू शकतो.

(वाचा :- पोट साफ न होणं, मुळव्याध, शौचाच्या जागेची जखम, बद्धकोष्ठतेसाठी अमृत आहे डॉक्टरांचे हे 5 उपाय, झटक्यात व्हाल बरे)

काय आहे आयुर्वेदिक कारण

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पचनसंस्थेचा अग्नीशी संबंध असतो आणि तो रात्री मंदावतो. साहजिकच अन्न पचलेच नाही तर विषारी घटक शरीरात जमा होऊ शकतात. याला अमा अर्थात विषारी पदार्थ म्हणतात आणि म्हणूनच अशा गोष्टींचे सेवन केल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा, मधुमेह, त्वचाविकार, पोटाचे विकार, हार्मोनल गडबड इत्यादी आजारांचा धोका वाढतो.

(वाचा :- Liver Cancer : तुमची ही एक चूक वाढवते तब्बल 75 टक्क्यांनी लिव्हर कॅन्सरचा धोका, करा हे उपाय, नाहीतर जीव धोक्यात)

टीप : ही एक सामान्य माहिती असून कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते पाउल उचला. कोणत्याही गोष्टीस महाराष्ट्र टाइम्स जबाबदार राहणार नाही.

वाचा आयुर्वेदिक डॉक्टरची पोस्ट..!

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.