रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन:सोयाबीन-कापसाची दरवाढ, कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई
सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकरी आणि तरुणांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु होत आहे. या आधी देखील तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकरी आणि तरुणांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे तुपकर यांनी आधीच जाहीर केले होते. आपल्या हक्कासाठी होणाऱ्या या आर-पारच्या लढाईत पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील तुपकर यांनी केले आहे. राजमात जिजाऊ यांचा सिंदखेडराजा येथील राजवाड्यात या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आरपारची लढाई अन्नत्यागाच्या मार्गाने शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. यामध्ये गावोगावच्या शेतकऱ्यांची साथ लाभत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आधी देखील पोळा सणाच्या दिवशी सिनगाव जहागीर येथील शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर आंदोलनाचे बॅनर झळकवत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचा इरादा स्पष्ट केला होता. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना बैलपोळ्यासारख्या जिव्हाळ्याच्या सणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी अन्नत्याग आंदोलनाला बळ दिले असल्याचे तुपकर यांनी त्या वेळी म्हटले होते. सोयाबीन-कापसाची दरवाढ, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविमा, शेतीला कंपाऊंड यासह महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आरपारची लढाई आपण पुकारली असल्याचेही त्यांनी म्हटले होते. राज्यातील इतरही बातम्या वाचा…. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास:राष्ट्रपतींच्या उदगीर येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा… शरद पवारांनी पुन्हा ठोकरली उद्धव ठाकरेंची मागणी:मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचे कारण नाही, आकडेवारीनुसार निर्णय घेणार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप विचार करण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे की, नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय हा निवडणुका झाल्यानंतर संख्येनुसार घ्यायचा असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल असे वातावरण आहे यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या निमित्त ते माध्यमांशी संवाद साधत होते. पूर्ण बातमी वाचा…. स्टेनलेस स्टील वापरले असते तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सल्लावजा सूचना सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी उपाय सुचवला आहे. समुद्रकिनाराच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…