मुंबई: टीम इंडियाने वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होणार आहे. भारताने किवी संघावर ७० धावांनी विजय मिळवला, या विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये वातावरण नेमके कसे होते, याचा एख विह्डिओ बासीसआयने शेअर केला आहे. या क्षणाचा सर्व खेळाडूंना खूप अभिमान वाटत होता, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी खूप धमाल केली जी व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
विजयानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण
अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण खूपच छान होते, यादरम्यान खेळाडूंनीही खूप एन्जॉय केला. संघाचा स्टाफ खेळाडूंचे कौतुक करताना दिसला. या दरम्यान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक यांनी विराट कोहलीला घट्ट मिठी मारली होती. एकंदरीतच भारतीय संघ आणि स्टाफ साठी तो एक इमोशनल क्षण होता, जो कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. यावेळी, हॉटेलमधून बाहेर पडल्यापासून ते बसमध्ये चढेपर्यंत चाहत्यांनी टीमला घेराव घातला होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाने चाहत्यांनाही खूप आनंद झाला. हॉटेलमध्ये हजारो चाहत्यांची गर्दी होती. टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात चाहत्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. उपांत्य फेरीचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी अहमदाबादला रवाना झाली.

याचदरम्यान भारताचा उपांत्य फेरीचा सामना पाहायला आलेला भारतीय संघाचं दमदार फिरकीपटू युजवेंद्र चहल याने ड्रेसिंग रूममध्ये जात खेळाडूंची भेट घेतली, सोबतच संघाला फायनलमध्ये पोहोचल्याचा शुभेच्छा दिल्या.
उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शानदार शतके झळकावली. विराट कोहलीचे हे वनडे इंटरनॅशनलमध्ये ५०वे शतक आहे आणि असे करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याशिवाय गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने ७ विकेट्स घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.