नाशिक :सध्या महाराष्ट्रासह सर्वत देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. परंतु नाशिकमध्ये या दिवाळी सणाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.फटाके उडवण्याच्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून ऐन सण उत्सवाच्या काळात झालेल्या हत्येच्या घटनेने नाशिक हादरले आहे. गौरव तुकाराम आखाडे (वय ३१, रा.पाथर्डी फाटा, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील पाथर्डी गावात स्वराज्य नगर येथे लक्ष्मपूजनाच्या दिवशी मयत गौरवच्या घराबाहेर शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते. लहान मुले दचकतात म्हणून त्यांनी फटाके मैदानात फोडण्यास सांगितले. तेव्हा काही युवकांशी फटाके उडवण्यावरून वाद झाले होते. काल पुन्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. यातील संशयित बबनराव यादवराव शिंदे, नारायण बबनराव शिंदे यांनी रागाच्या भरात त्याच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार केले.

या हल्ल्यात गौरव मयत झाला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून मृत गौरव यांच्या पत्नी सपना आखाडे यांच्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ संशयित अजून फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी 15 ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
फटाके फोडण्याच्या कारणातून तरुणाची सणासुदीच्या काळात हत्या झाल्याने नाशिकच्या पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. किरकोळ कारणातून तरुणाची हत्या झाल्याने दिवाळीच्या सणाला देखील गालबोट लागला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News