वाचा: Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल
Vi चे १५१ रुपयांचे व्हाउचर मोफत Disney+ Hotstar मोबाइल सदस्यत्व देते:
Vodafone Idea ने अलीकडेच युजर्ससाठी 4G डेटा व्हाउचरची घोषणा केली आहे. त्यापैकी १५१ रुपयांचे व्हाउचर होते. या व्हाउचरसह, युजर्सना ८ GB डेटा मिळतो जो एकरकमी वापरला जाऊ शकतो. हे केवळ 4G व्हाउचर असल्याने युजर्सना त्यासोबत फक्त डेटा मिळतो. यासोबत व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएसचा कोणताही फायदा नाही. या डेटा व्हाउचरसह डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन ही एक विनामूल्य ऑफर असेल आणि युजर्सना ते सक्रिय करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
बजेट कमी असेल तर:
कमी खर्च करायचा असेल पण तरीही OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवायचे असेल, तर तुम्ही Vi चे ८२ रुपयांचे डेटा व्हाउचर घेऊ शकता. याची घोषणा देखील अलीकडेच करण्यात आली होती आणि ते युजरना SonyLIV प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देते. ८२ रुपयांच्या व्हाउचरसह, १४ दिवसांच्या वैधतेसह ४ GB एक-वेळ डेटा मिळतो. लक्षात ठेवा की, प्लॅनसह ऑफर केलेले SonyLIV सबस्क्रिप्शन फक्त २८ दिवसांच्या वैधतेसह येते. त्यामुळे तुम्हाला ते पुन्हा हवे असल्यास तुम्ही २८ दिवसांनंतर तेच डेटा व्हाउचर खरेदी करू शकता.
वाचा: Battery Fans: १४९ रुपयांत घरी आणा ‘हा’ रिचार्जेबल फॅन, लाईट नसतांना देईल साथ, पाहा डिटेल्स