वाचा: अरेच्चा! मनुष्याप्रमाणे विचार करू शकते Google चे AI चॅटबॉट, इंजिनिअरची नोकरी धोक्यात
जिओचा २,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लान
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे २,९९९ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जातो. अशाप्रकारे, प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये ओटीटी बेनिफिट्स देखील दिले जात आहे. यात तुम्हाला डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.
जिओचा २,८९९ रुपयांचा रिचार्ज प्लान
Jio कडे २,८७९ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७३० जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, या प्रीपेड प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात आहे. तुम्ही जर जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर हा रिचार्ज फायद्याचा ठरेल. तसेच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास २,९९९ रुपयाचा रिचार्ज तुम्हाला उपयोगी येईल.