नवी दिल्ली: BSNL Prepaid Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि वीआय (Vi) सातत्याने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका देत आहे. यातच एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL ) अद्याप आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवलेल्या नाहीयेत. त्यामुळे ग्राहक इतर कंपन्यांची साथ सोडत बीएसएनएलची निवड करत आहे. BSNL देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान्स सादर करत आहे. कंपनीकडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे असेच काही शानदार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये Jio, Airtel आणि Vi च्या तुलनेत जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. BSNL च्या अशाच शानदार प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Smartphone Offers: ९ हजार रुपये स्वस्तात खरेदी करा Xiaomi चा ५जी स्मार्टफोन, मिळेल ६४MP ट्रिपल कॅमेरा आणि १२८GB स्टोरेज

BSNL चे स्वस्त प्रीपेड प्लान्स

बीएसएनएलकडे (BSNL) कमी किंमतीत येणारे दोन शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये ९० दिवसांसाठी जबरदस्त बेनिफिट्स दिले जातात, जे इतर कंपन्यांच्या रिचार्जमध्ये मिळत नाही. प्लानमध्ये डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह इतर अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. कंपनीकडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा ४८५ रुपयांचा प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण १.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, दररोज १०० एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानची वैधता ९० दिवस आहे.

वाचा: Smartphone Offers: ९ हजार रुपये स्वस्तात खरेदी करा Xiaomi चा ५जी स्मार्टफोन, मिळेल ६४MP ट्रिपल कॅमेरा आणि १२८GB स्टोरेज

बीएसएनएलच्या (BSNL) ५०० रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या दुसऱ्या प्लानची किंमत ४९९ रुपये आहे. यामध्ये ९० दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये ९० दिवसांसाठी दररोज १०० एसएमएस, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. हा प्लान अतिरिक्त बेनिफिट्ससह येतो. यात BSNL Tunes आणि फ्री Zing सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. दरम्यान, BSNL कडे अद्याप ४जी नेटवर्क उपलब्ध नाही. मात्र, कंपनी लवकरच देशभरात ही सर्विस उपलब्ध करण्याची शक्यता आहे. ४जी नेटवर्क उपलब्ध केल्यास खासगी टेलिकॉम कंपन्या जिओलॉ (Jio), एअरटेल (Airtel) आणि वीआयला (Vi) मोठा फटका बसू शकतो.

वाचा: boAt चे शानदार ब्लूटूथ स्पीकर लाँच, पार्टी दणाणून सोडणार; किंमत फक्त…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.