नवी दिल्ली: Best Foldable Fans: कुलर-एसीच्या किमती अधिक असल्यामुळे प्रत्येकालाच हे कुलिंग डिव्हाइसेस खरेदी करणे परवडत नाही. अशात काही लोक इतर कुलिंग डिव्हाइसेसचा पर्याय शोधतात. याशिवाय, अनेक ठिकाणी सतत लाईट जात असल्यामुळे गर्मीमुळे लोक त्रस्त आहेत. नको त्या वेळी लाईट गेल्याने गर्मीमुळे जीव नकोसा होतो. पण,आता काळजीचे कारण नाही. सध्या मार्केटमध्ये अशी अनेक उपकरणे आहेत. जी चालवायला विजेची गरज नाही. विजेशिवाय तुम्ही गर्मीपासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका भन्नाट पंख्याबद्दल सांगणार आहो. जो, विजेशिवाय जबरदस्त कुलिंग देतो. जाणून घेऊया सविस्तर.

वाचा: Smartphone Discounts: ट्रिपल रिअर कॅमेरासह येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोनची किंमत झाली कमी, ऑफर पाहताच तुम्हीही कराल खरेदी

अॅडोनाय फोल्डिंग फॅन:

अॅडोनाय फोल्डिंग फॅन वजनाने खूपच हलका आहे आणि विजेशिवाय खोलीला थंड करतो. त्यात बॅटरी बसवण्यात आली आहे. पूर्ण चार्ज होताच ते तासन्तास विजेशिवाय चालते. पंख्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी यात यूएसबी पोर्ट आहे. यात एलईडी लाईटही आहे, जी आपत्कालीन स्थितीत वापरली जाऊ शकते. हा पंखा स्वयंपाकघर, ऑफिसमध्ये कुठेही वापरता येतो. हा पंखा फोल्ड करता येतो . म्हणजेच Device बॅगमध्येही ठेवता येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंखा १८० अंशांपर्यंत फिरू शकतो. म्हणजेच, भिंतीवर किंवा टेबलवर ठेवता येतो . यामुळे आजूबाजूला हवा मिळते आणि खोली त्वरित थंड होते. हे device खूप हलके आहे, ते कुठेही सहज कॅरी करता येईल. हे डिव्हाइस पूर्णपणे प्लास्टिकपासून बनविलेले आहे. यामध्ये बटणे देण्यात आली आहेत. ज्याद्वारे पंखा कंट्रोल करता येतो.

वाचा: Best AC : ‘या’ बेस्टसेलर AC चा धुमाकूळ, डिव्हाइसमध्ये आहे ६ इन १ कूलिंग फीचर, खरेदीवर ४१ % ऑफ

Adonai फोल्डिंग फॅन: किंमत

हा पोर्टेबल फॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करता येतो. Adonai Folding Fan ची किंमत १८९९ रुपये आहे. पण Amazon वर १,१९८ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फॅनवर पूर्ण ३७ % सूट देण्यात आली आहे.

वाचा: Smart TV Offers: ५ हजारांनी स्वस्त मिळतोय पॉप्युलर कंपनीचा ३२ इंचाचा Smart TV, सुरूय सेल, पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.