महात्मा गांधींबद्दल कंगनाची वादग्रस्त पोस्ट:सोशल मीडियावर लिहिले; “देश के पिता नहीं, देश के तो लाल होते हैं”
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंडीच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून, त्यावरून खळबळ उडाली आहे. कंगना यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकली, ज्यामध्ये लिहिले की, देश के पिता नहीं देश के तो लाल होते हैं। धन्य हैं, भारत मां के ये लाल, खाली लाल बहादूर शास्त्रींचा फोटो आहे. आज देशभरात गांधी जयंती साजरी केली जात आहे. राज्यातील जनता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. यावेळी कंगनाने राष्ट्रपिता यांना लाल असे संबोधून नवा वाद निर्माण केला आहे. महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ का म्हटले गेले? सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ हा सन्मान दिला होता. गांधीजींना त्यांनी ही पदवी दिली कारण ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते होते आणि त्यांनी देशाला एकसंघ केले होते. तेव्हापासून त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवले जाते.