मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्व, कॉमेडी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, त्यांचे चाहते अन् कुटुंबीय या सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. दरम्यान या सर्वांमध्ये एका कॉमेडियनने अशी कमेंट केली की तो ट्रोलिंगची शिकार ठरला. कॉमेडियन रोहन जोशीची त्याच्या एका कमेंटमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. त्याने ती कमेंट डिलिट केल्यानंतरही राजू यांचे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

सोशल मीडियावर ‘RIP राजू श्रीवास्तव’, ‘राजू श्रीवास्तव नेहमी आठवणीत राहतील’, ‘राजू श्रीवास्तव यांच्या आत्म्याला शांती लाभो’ अशा कमेंट्स येत होत्या. राजू यांच्या आठवणीत अशीच एक पोस्ट कॉमेडियन अतुल खत्री याने केलेली. त्यावर कमेंट करताना रोहनने वापरलेली भाषा नेटकऱ्यांना काही रुचली नाही. एखाद्याच्या निधनानंतर अशी कमेंट करणं किती चुकीचं आणि असंवेदनशील आहे, प्रसिद्धीसाठी रोहनने हा प्रकार केला इ. असे विविध रिप्लाय त्याला या कमेंटवर आले होते. अखेर रोहनने ही पोस्ट डिलिट केली, पण अजूनही अतुलच्या पोस्टवर रोहन जोशीला टॅग करत राजू यांचे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

हे वाचा-सकाळी ०९.३० वाजता होणार राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; भावाच्या घरी अंत्यदर्शन

काय होती ती कमेंट?

अतुल खत्री या कॉमेडियनने राजू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक पोस्ट केली होती. ज्यावर कमेंट करत रोहनने राजू यांच्यावर टीका केली. त्याची या कमेंटमधील भाषा अनेकांना आक्षेपार्ह वाटली. रोहनच्या कमेंटचा आशय असा होता की, आपण काहीही गमावलं नाही. मग कामरा असो किंवा एखादं रोस्ट किंवा बातम्यांमध्ये आलेला एखादा कॉमिक असो, राजू श्रीवास्तव यांनी नवीन कॉमिक्सबद्दल वाईट बोलण्याची एकही संधी गमावली नाही, विशेषत: जेव्हा स्टँड अप कॉमेडीची नवी लाट पसरली होती. तो प्रत्येक न्यूज चॅनेलवर गेला आणि या नव्या कलेबद्दल वाईट बोलला. त्याने या गोष्टीला आक्षेपार्ह म्हटले कारण त्याला हे काय आहे ते समजत नव्हते आणि नवीन तारे उदयास येत होते. त्याने काही चांगले विनोद सांगितले असतील पण त्याला कॉमेडीचे स्पिरिट किंवा आपण सहमत नसलो तरी एखाद्याच्या बोलण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्याबद्दलही त्याला काहीही समजले नाही.

Rohan Joshi Comment

हे वाचा-राजू श्रीवास्तव यांना मिळाली होती दाऊद इब्राहिमकडून धमकी, या घटना कोणाला माहीत नसतील

रोहनने त्याची ही कमेट आता डिलिट केली असून ती का डिलिट केली याचं स्पष्टीकरणही दिले. त्याने असं म्हटलं की आजचा दिवस त्याच्या वैयक्तिक भावनांबाबत नाही. त्याने माफीही मागितली. याशिवाय रोहनने विविध कमेंट्समध्ये त्याला टीका करणाऱ्यांना रिप्लायही दिला आहे. पण यानंतर रोहनला ट्विटर त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवर ट्रोल केलं जात आहे. रोहनच्या जुन्या पोस्टही व्हायरल केल्या जात आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर ०९.३० वाजता दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचे पार्थवर बुधवारीच त्यांच्या भावाच्या घरी अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.