सप्तशृंगगडावर रस्त्यांची दुरुस्ती सुरू, तात्पुरत्या बसस्थानकाचीही उभारणी:गुरुवारपासून नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्ता खासगी वाहनांना बंद
सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी विविध कामांसाठी मंगळवारी यंत्रणा कामाला लागली. यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दै. ‘दिव्य मराठी’ने दि. १ रोजीच्या अंकात सप्तशृंगगडावरील समस्या व प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रकाश टाकणारे वृत्त प्रसिद्ध करताच मंगळवारी यंत्रणा कामाला लागली. गडावरील गावांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व चिखल असेल तिथे कच, खडी टाकण्याचे काम करण्यात आले. यामुळे भाविकांना दर्शनासाठी चांगला रस्ता मिळणार आहे. आठ दिवसांपूर्वी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. यात बहुतांश अधिकाऱ्यांनी कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नव्हती. याच गोष्टीची पाहणी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली व सचित्र वृत्तांत मांडला. यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली व सर्व विभागांनी आपापली कामे सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून गडावर खासगी वाहनांना बंदी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते १२ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत, याशिवाय १६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमानिमित्त सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत नांदुरी ते सप्तशृंगगड घाट रस्ता खासगी वाहनांना बंद असेल. या दरम्यान २०० बसेस भाविकांची ने-आण करतील. भाविकांनी बसेसचा वापर करावा, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वा. सुवर्ण अलंकारांची पूजा व मिरवणूक. सकाळी ७ वा. सप्तशृंगी देवीची पूजा महाअभिषेक. सकाळी ९.३० वा. मंदिरात घटस्थापना. दुपारी १२ वा. महानैवेद्य आरती. यावेळी महाराष्ट्रातून आलेले किमान पाच हजार भाविक घटी बसतील. तसेच सायंकाळी ७ वा. सांज आरती आणि शांतिपाठ आदी कार्यक्रम होणार. तर ११ ऑक्टो. दुपारी ३ वा. कीर्ती ध्वजपूजा आणि मिरवणूक, १२ ऑक्टोबरला दसरा पूजा. मंदिरात बलीपूजन कार्यक्रम, १६ ऑक्टो. रोजी कोजागरी पौर्णिमा साजरी करून नवरात्रोत्सव सांगता होईल.