‘आमचे गाव, आमच्या शाळा’ मोहिमेंतर्गत एकवटले चांदूरवासी:तालुका शाळा बचाव समितीचे एसडीओंना निवेदन
‘आमचे गाव, आमच्या शाळा’ या मोहिमेअंतर्गत चांदूर रेल्वे तालुकावासी एकवटले असून एसडीओंसमोर तालुक्यातील शासकीय शाळांतील विविध समस्यांचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदन सोमवारी (दि. ३०) एसडीआंेना दिले. चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील सर्व प्रकारच्या शाळांची स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या मराठी माध्यमाच्या अनेक शाळा शेवटच्या घटका मोजायला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकेकाळी गजबजलेल्या मराठी शाळा विद्यार्थी संख्येच्या अभावाने विपन्न स्थिती भोगत आहेत. तालुक्यातील अनेक शासकीय शाळांच्या इमारती, त्यातील दारे, खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. अनेक शाळांना सुसज्ज क्रीडांगण नाही. शिक्षक-विद्यार्थ्यां सांठी योग्य स्वच्छतागृहांचा अभाव आहे यासह अनेक समस्या या शाळांना भेडसावत आहेत. या समस्या एसडीओंना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आल्या असून हे निवेदन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्य सचिव यांना पाठवण्यात आले असून स्थानिक गटशिक्षणाधिकारी व मुख्याधिकारी यांना सुध्दा देण्यात आले. निवेदन देते वेळी चांदूर रेल्वे तालुका शाळा बचाव समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, उपाध्यक्ष हर्षल वाघ, प्राविण्य देशमुख आदींसह सदस्य उपस्थित होते.