मुंबई: सध्या कांतारा या सिनेमाचा चांगलाच बोलबाला आहे. कांतारा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. ऋषभ शेट्टी कांतारातील अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे चांगलाच चर्चेत आहे. ऋषभसोबत काम करण्यासाठी आता प्रत्येक अभिनेत्री अगदी एका पायावर तयार आहे. पण ऋषभ मात्र साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत सिनेमात काम करायला तयार नाही हे ऐकून अनेकांना यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यातच आता एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून यामधून ऋषभ आणि रश्मिका भविष्यात एकत्र सिनेमात दिसणार नाहीत याचं कारण समोर आलं आहे.
राखी सावंतनं केली भाईजानची पोलखोल,अभिनेत्रीला बघून म्हणाली,या तर आमच्या वहिनीसाहेब!
कांतारा हा सिनेमा कोणताच निर्माता प्रोड्यूस करायला तयार नव्हता तेव्हा ऋषभनेच हे धाडस केलं. अवघ्या १५ कोटींमध्ये त्याने कांतारा बनवला आणि आता पहिल्या दोन आठवड्यातच त्याने ३०० कोटींपेक्षा जास्त झालं आहे. आता ऋषभ कोणत्या अभिनेत्रीसोबत पुढचा सिनेमा करणार याचीही उत्सुकता वाढली आहे. यावरूनच जेव्हा ऋषभला जेव्हा एका मुलाखतीत प्रश्न विचारला तेव्हा तो म्ह्णाला, आधी मी माझी कहाणी पूर्ण करतो आणि मगच माझ्या सिनेमातील कलाकारांची निवड होते. मला नवीन कलाकारांसोबत काम करायला खूप आवडते कारण त्यांच्यात कोणताही अहंकार नसतो. अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत मला काम करायला आवडत नाही ते त्यांच्यातील अॅटीट्यूडमुळे. पण साई पल्लवी आणि सामंथा यांचं काम मला आवडतं।

सध्या बॉलिवूड आणि साउथमध्ये रश्मिका मंदानाची हवा आहे, पण तरीही ऋषभला तिच्यासोबत काम करायचं नाही. याचं कारण सांगणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये रश्मिका असं म्हणत आहे की, तिला खरंतर अभिनयात यायचंच नव्हतं. ती अपघातानेच या क्षेत्रात आली. पण सुरूवातीच्या दिवसात दिला एका प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला होता. तिला वाटलं की कुणीतरी तिच्याशी चेष्टा करत आहे, त्यातून रश्मिकाने त्या प्रॉडक्शन हाऊसविषयी वाईट प्रतिक्रिया दिल्या. रश्मिकाने ऋषभच्या खास मित्राचं रक्षित शेट्टीच्या प्राॅडक्शन हाउसचं नाव न घेता कन्नड सिनेमांबाबत चुकीचं मतही व्यक्त केलं. त्यावरून रश्मिका ट्रोल झाली. खरंतर ज्या प्रॉडक्शन हाऊसबाबत रश्मिकाने चुकीची प्रतिक्रिया दिली त्याच परमवाह या रक्षित शेट्टीच्या प्रॉडक्शनने रश्मिकाला अभिनयात पहिली संधी दिली होती.

राखी सावंतनं केली भाईजानची पोलखोल,अभिनेत्रीला बघून म्हणाली,या तर आमच्या वहिनीसाहेब!
रश्मिका मंदाना सध्या विजय देवरकोंडासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांचे एकत्र फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत. अजून तरी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी खुलेआम काही सांगितलेलं नाही. रश्मिका चर्चेत आली ती पुष्पा या सिनेमातील तिच्या गावरान लुकमुळे. रश्मिकाने साकारलेल्या श्रीवल्ली या भूमिकेला चाहत्यांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं. पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुनसोबत तिची जोडी छान जमली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *