नांदेड: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रशासनाच्या निषेधार्थ नांदेड मधील धानोरा मक्ता येथील गावकऱ्यांनी नदीपात्रात राष्ट्रगीत गायले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ते गांधी नगर रस्ता तसेच गावातील नदीवर पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदी पात्रातून गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मागणी करूनही शासन प्रशासन लक्ष देत नसल्याने, निषेध म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ग्रामस्थांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान या मागणीची दखल घेतली गेली नाही, तर येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला याच नदी पात्रात आत्मदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.