मुंबई : ऑस्कर २०२३ साठी प्रवेशाच्या अधिकृत प्रवेशाला सुरुवात झाली आहे. याची घोषणा १२ मार्च २०२३ ला होणार आहे. भारतातर्फे ऑस्कर २०२३ साठी छेलो शो या गुजराती सिनेमाचं नॉमिनेशन झालं आहे. खरं तर ऑस्कर २०२३ साठी भारतातर्फे एसएस राजामौली याच्या आरआरआर आणि विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स हे सिनेमे ऑस्करला पाठवले जातील असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु या दोन्ही सिनेमांऐवजी ‘छेलो शो’ चा समावेश झाला. त्यावरून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

धर्माभिमानी हिंदूच्या सूडाची कथा साकारतोय सुबोध भावे, शेअर केला Photo

यामध्ये आता आर माधवन यानंदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याच्या मते ‘रॉकेट्री’ सिनेमालादेखील ऑस्करसाठी पाठवायला हवं होतं. अर्थात त्यांनं ही गोष्ट गंमतीत म्हटली असली तरी यातून त्यानं मनातील सल व्यक्त केली. तर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा सिनेमा डावल्याबद्दल प्रतिक्रिया देताना आपल्याला त्यामुळे काही फरक पडत नाही असं म्हटलं आहे.

गुजराती सिनेमा ‘छेलो शो’ याची ऑस्करमध्ये भारतातर्फे अधिकृत प्रवेश झाला आहे. आर माधवन आणि त्याचा सह कलाकार दर्शन कुमारनं मजेत म्हटलं की रॉकेट्री आणि द काश्मीर फाईल्स सिनेमांचाही ऑस्करसाठी विचार व्हायला हवा होता. त्यानंतर तो पुढं म्हणाला की, ‘दर्शन ‘द काश्मीर फाईल्स’साठी अभियान सुरू करणार आहे. तर मी ‘रॉकेट्री’साठी कॅंपेन सुरू करणार आहे. त्यानंतर माधवन म्हणाला ही सगळी गंमत आहे. छेलो शो सिनेमासाठी आमच्या शुभेच्छा. मला अपेक्षा आहे की, या सिनेमाला पुरस्कार मिळेल आणि आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटेल. ही वेळ आहे आपण सर्वजण काही तरी चांगलं करू, एक देश म्हणून आपण काही तरी चांगलं करू या.’

आर माधवन सध्या त्याच्या आगामी धोखा : राउंड दी कॉर्नर या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. त्यानं एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऑस्करमधील समानतेबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, ‘देशात ऑस्कर आल्यानंतर काही गोष्टी बदलतील, काही गोष्टी अधिक चांगल्या होतील अशी माझी अपेक्षा आहे. आतापर्यंत जे काही झालं खूप झालं. आम्ही काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.’ अपारशक्ती खुराना यानं माधवन याच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटलं आहे की, ‘आमच्यासाठी एक अधिकृत पुरस्कार सोहळ्याची गरज आहे.’

अजयवर ‘थँक गॉड’ नाही तर’अरे देवा’ म्हणण्याची वेळ! मंत्र्यांकडून बॅन करण्याची मागणी

विवेक म्हणाले मला फरक पडत नाही

तर दुसरीकडे छेलो शो सिनेमा ऑस्करला पाठवल्याबद्द्ल द काश्मीर फाईल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की या गोष्टींमुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. विवेक यांनी छेलो शो सिनेमा ऑस्करमध्ये जात असल्याबद्दल त्याच्या निर्मात्यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले की, ‘या सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. माझ्याकडे याव्यतिरीक्त सांगण्यासारखं काही नाही. मला या गोष्टींमुळे काहीही फरक पडत नाही. जेव्हा स्वतंत्रपणे ऑस्करमध्ये जाणाऱ्या सिनेमाची गोष्ट येते, तेव्हा निर्मात्यांना काही तरी गोष्ट ठरवावीच लागते.’

सोशल मीडियावर आरआरआरचीही होती चर्चा

दरम्यान, सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स आणि एसएसएस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमा ऑस्करला पाठवण्यासंदर्भात खूप चर्चा होती. नेटकऱ्यांच्या मते या दोनपैकी एखादा सिनेमा ऑस्करला पाठवायला हवा होता. परंतु गुजराती सिनेमा छेलो शो ची निवड झाली. जेव्हा हा सिनेमा भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला जात असल्याचं जाहीर झालं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

‘मजा मा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी दीक्षितची रेडिओ मिर्चीला हजेरीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.