मुंबई:टेनिस विश्वातील मोठं नाव असलेला रॉजर फेडरर याने काहीच दिवसांपूर्वी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. दुखापतीतून सावरण्यास लागला वेळ, वाढते वय यामुळे ४१ वर्षीय स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू फेडररने स्पर्धात्मक टेनिस थांबवण्याचा निर्णय घेतला. या आठवड्यातील ‘लेव्हर कप’ ही सांघिक स्पर्धा खेळून तो टेनिसला अलविदा करणार आहे. तर आपल्या निवृत्तीच्या या निर्णयाबाबत फेडररने भाष्य केले आहे.

४१ वर्षीय स्विस टेनिसपटू फेडरर म्हणाला, ‘मागील तीन वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली. जेव्हापासून मी विम्बल्डन खेळलो आहे, तेव्हापासून कोर्टपासूनचे अंतर वाढत आहे, हे मला माहीत होते. खरे सांगायचे तर, मी परत येण्याचा प्रयत्न केला, पण मलाही माझ्या मर्यादा आहेत.

शिखर धवनने शेअर केला संतापजनक घटनेचा व्हिडिओ; कबड्डी खेळाडूंना शौचालयात दिले जेवण?

फेडररचे म्हणणे आहे की, त्याने निवृत्तीबाबत कोणतीही विशिष्ट योजना आखलेली नाही. स्वित्झर्लंडमधून युवा टेनिस टॅलेंट बाहेर आणण्यासाठी कोचिंग सुरू करणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. “मला स्वित्झर्लंडमधून नवीन टेनिस स्टार शोधायचा आहे,” असे तो म्हणाला.

लेव्हर कपपूर्वी रॉजर फेडरर म्हणाला- ‘काही महिन्यांपूर्वी माझे स्कॅन झाले होते आणि त्याचे अहवाल माझ्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. मग मला वाटू लागलं की मी निवृत्त व्हावं. मग निवृत्ती कधी आणि कशी जाहीर करायची हा प्रश्न होता. तो काळ खूप तणावाचा होता.’

भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यावर मोठं संकट, मॅच खेळवण्यासाठी लाईटचं नाही

आपल्या निवृत्तीच्या विचारांपासून नेहमी दूर रहा

फेडररने सोशल मीडियावर पाच पानी पत्र लिहून निवृत्ती जाहीर केली. फेडरर म्हणाला, ‘हे शब्द लिहिण्यासाठी मला अनेक आठवडे लागले. मला जे वाटत आहे ते मी शब्दात मांडावे अशी माझी इच्छा होती. मी माझ्या निवृत्तीच्या विचारांपासून नेहमीच दूर राहिलो आहे. मी त्याबद्दल जितका जास्त विचार केला तितक्या लवकर मी निरोप घेतला असता. तेव्हा असा विचार केला की, अशी वेळ आल्यावर मी त्याला सामोरे जाईन.’

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कोच द्रविड यांच्या जिव्हारी लागला; टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIक

अपेक्षेपेक्षा जास्त साध्य केल्याचा खूप आनंद

  • फेडरर म्हणतो की इतकं यश मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. खूप काही साध्य करू शकलो, याचा खूप आनंद आहे
  • स्वित्झर्लंडचा टेनिस किंग ३१० आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला
  • सलग २३७ आठवडे अव्वल स्थानावर अटळ होता.
  • फेडररने १०३ एटीपी एकेरी विजेतेपद पटकावले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.