नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आता भारतीय संघात रवीचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अश्विनने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. अश्विनची ही प्रतिक्रीया क्रिकेट विश्वात चांगलीच व्हायरल झाली आहे.

अश्विनने गेल्या दीड वर्षात फक्त दोनच वनडे सामने खेळले होते. त्यामुळे त्याची यावेळी निवड होईल, हे कोणाच्या ध्यानातही नव्हते. पण अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यावेळी सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि अश्विनची निवड भारतीय संघात केली. या निवडीनंतर अश्विनची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

अश्विनेने भारतीय संघात निवड झाल्यावर एक ट्विट केले या ट्विटमध्ये अश्विन म्हणाला आहे की, ” रोहित आणि राहुल द्रविड सर यावेळी तुम्ही माझ्यावर जो पुन्हा एकदा विश्वास ठेवलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही ठेवलेल्या विश्वासामुळेच मला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान मिळाले आहे. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करताना तुम्ही दिलेल्या या संधीचे सोनो करण्याचा प्रयत्न करेन.” अश्विनची या संघात निवड होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण अश्विनची निवड झाली आणि त्यांनतर बऱ्याच जणांना धक्का बसला. कारण अश्विनचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेला धूळ चारली, टीम इंडियाचे खेळाडू कलिना एअरपोर्टवर स्पॉट

या मालिकेसाठी निवडण्यात आलेले दोन्ही संघ कसे आहेत, जाणून घ्या…
पहिल्या दोन वन-डेंसाठी : लोकेश राहुल (कर्णधार – यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या वन-डेसाठी : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल (तंदुरुस्त असल्यास), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *