रोहित पवार मुख्यमंत्री होणार?:रोहित पुढची 5 वर्षे महाराष्ट्राची सेवा करेल, शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार म्हणाले की, रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे. तिथे काम करण्याची तुला चांगली संधी आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवल्याचे शरद पवार यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यावेळी म्हटले आहे. नेमके पवार काय म्हणाले? शरद पवार म्हणाले की, माझी पाच वर्षे आमदार म्हणून राहिलो. त्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात काही खात्यांच्या राज्यमंत्री मिळत गेले. पण वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. विशेष म्हणजे एकदाच नाही तर चार वेळा मुख्यमंत्री झालो, असे म्हणत पवारांनी आठवणींनाही उजाळा दिला. तर रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असतील तर महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल, असे शरद पवार यांनी म्हटल्याने रोहित पवार यांचाही मुख्यमंत्रीपदाचा प्रवास तर पवारांनी सांगितला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तुम्ही कसले भूमिपुत्र..? शरद पवार म्हणाले की, तुम्ही भूमिपुत्राच्या गप्पा मारू नये,दहा वर्ष तुम्ही आमदार होतात. पाच वर्षे मंत्री होतात, तरीही सर्वसामान्य माणसांचे एकही प्रश्न तुम्ही सोडू शकले नाहीत. सर्वसामान्य माणसांसाठी एमआयडीसी सारख्या चांगल्या प्रश्नाला इथल्या माजी लोकप्रतिनिधीने विरोध केला. अडथळे आणण्याचे काम केले. तुम्ही कसले भूमिपुत्र..? असा टोला राम शिंदे यांनी लगावला आहे.