नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शीतयुद्ध सुरुच आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीला वैतागून रोहित शर्मा हा यावर्षीच मुंबई इंडियन्सची साथ सोडून जाऊ शकतो. याबाबत आयपीएलचे काही नियम आहेत. हे नियम नेमके आहेत तरी काय, ते आता स्पष्ट झाले आहेत.

आयपीएलमध्ये लिलाव होतो, ते सर्वांनाच माहिती आहे. पण संघाने रिटेन केलेल्या ठराविक खेळाडूंचा लिलाव होत नाही. त्यासाठी आयपीएलमध्ये अजून एक गोष्ट करता येऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे खेळाडूंची देवाण-घेवाण केली जाते. यामध्ये संघातील कोणताही खेळाडू सहभागी होऊ शकतो. मुंबई इंडियन्सने काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्याला यापद्धतीनेच आपल्या संघात दाखल केले होते. यामध्ये दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे एका खेळाडूच्या बदलल्यात दुसऱ्या खेळाडूला संघात स्थान दिले जाते. आपल्याकडील एक खेळाडू गेल्यावर समोरच्या संघातील एक खेळाडू आपल्याला घेता येऊ शकतो. जर ही गोष्ट करायची नसेल, तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या खेळाडूसाठी एक ठराविक रक्कम मोजावी लागले. ज्या संघाला हा खेळाडू घ्यायचा आहे, त्याने समोरच्या खेळाडूला एक ठराविक रक्कम द्यावी लागते आणि त्याचबरोबर ट्रान्सफर फी देखील भरावी लागते. या दोनपैकी एका माध्यमातून आपल्या संघात आवडत्या खेळाडूला घेता येऊ शकते. जर सध्याच्या घडीला रोहित शर्माला एखाद्या संघाला आपल्या ताफ्यात दाखल करायचे असेल तर त्यासाठी त्यांना आपला एक खेळाडू मुंबई इंडियन्सला द्यावा लागेल किंवा ठराविक रक्कम मोजावी लागेल. जर एखादा संघ हे करण्यासाठी तयार असेल, तर रोहित शर्मा यावर्षी मुबंई इंडियन्सला सोडून दुसऱ्या संघात जाऊ शकतो.

खेळाडूला ट्रान्सफर करण्याची अंतिम तारीख काय आहे….

एखादा संघ खेळाडूला कधीही आपल्या संघात घेऊ शकत नाही. लिलावानंतर ट्रेडिंग विंडो उघडते तेव्हा आपल्या आवडत्या खेळाडूला त्यांना संघात घेता येऊ शकते. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या एक महिन्यापूर्वी हा ट्रेड कोणताही संघ करू शकतो. यावर्षी आयपीएल २२ मार्चला सुरु होणार आहे. त्यामुळे आता जर कोणत्याही संघाला रोहित शर्माला आपल्या संघात घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी २१ फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर मात्र ते रोहित शर्माला आपल्या संघात स्थान देऊ शकणार नाही आणि त्याला यावर्षी मुंबई इंडियन्सच्या संघातच खेळावे लागू शकते.

रोहित शर्मा एअरपोर्टवर स्पॉट

खेळाडूला ट्रेड करण्यासाठी अजूनही १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या १० दिवसांत रोहित शर्माला कोणता संघ आपल्या ताफ्यात दाखल करतो, याची उत्सुकता आता सर्वांनाच असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *