कोलंबो : रोहित शर्मा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. आशिया कपमध्ये रोहित शर्माने सलग तिसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने १० हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. पण त्याचबरोबर रोहित शर्माने आशिया चषकात इतिहास रचला आहे. कारण रोहितसारखी कामगिरी आतापर्यंत आशिया कपमध्ये कोणाला करता आलेली नाही. त्यामुळे त्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड जगभरात गाजत आहे.

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ५३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या सामन्यात रोहितने सात चौकार आणि दोन षटकारांची अतिषबाजी केली. रोहितने या सामन्यात शाहिद आफ्रिदीचा षटकारांचा विक्रमही मोडीत काढला आहे. हे सर्व करत असताना रोहितने एक अशी गोष्ट केली आहे की, आतापर्यंत ही गोष्ट कोणत्याही क्रिकेटपटूला जमलेली नाही. त्यामुळे रोहित हा जगभरात अव्वल फलंदाज ठरला आहे.

रोहितने धावांचा डोंगर उभारत आशिया कपमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली आहे. रोहित शर्मा हा आता आशिया कप स्पर्धेत आठ हजार धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेत कोणत्याही खेळाडूला आठ हजार धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. पण रोहितने श्रीलंकेच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि त्याने आशिया चषक स्पर्धेत ८ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. त्याचबरोबर या अर्धशतकासह रोहितने अजून एक विक्रम रचला आहे. रोहितचे हे आशिया चषक स्पर्धेतील १० वे अर्धशतक ठरले आहे. आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम हा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत आठ अर्धशतकं झळकावली होती. पण रोहितच्या नावावर आता १० अर्धशतकी खेळी झाल्या आहे. दोन दिवसांत रोहितने दोन अर्धशतकं झळकावली. त्यामुळे आता रोहितने सचिनला मागे टकत आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आशिया कपपूर्वी रोहित शर्मा पत्नी अन् लेकीसह तिरुपती बालाजी चरणी

रोहित शर्माने दोन दिवसांत दोन अर्धशतकं झळकावली. या दोन अर्धशतकांच्या जोरावर रोहितने आशिया कप स्पर्धेत इतिहास रचला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *