नागपूर : आजच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने भारताला एकहाती विजय मिळवून दिला. गेल्यया काही सामन्यांपासून रोहितला फलंदाजी सातत्य ठेवता आले नव्हते. पण या सामन्यात मात्र त्याने तुफानी फटकेबाजी केली.

रोहितने या सामन्यात असं काय वेगळं केलं, जाणून घ्या….
गेल्या काही दिवसांमध्ये रोहित हा अपयशी ठरत होता. पण आजच्या सामन्यात तो यशस्वी ठरला. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित हा फलंदाजीला आल्यापासून पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करायचा. पण ही चूक त्याने आजच्या सामन्यात केली नाही. ही चुक त्याने आजच्या सामन्यात सुधारली. पहिले तिन्ही चेंडू तो शांत होता. त्यानंतर रोहितने एक षटकार मारला. त्यानंतरही रोहित जास्त आक्रमक झाला नाही. त्यानंतर थेट दुसऱ्या षटकात त्याने षटकार खेचला. रोहित हा असा फलंदाज आहे की, तो स्थिरस्थावर झाल्यावर मोठी फटकेबाजी करतो आणि हीच गोष्ट रोहितने यावेळी करून दाखवली. त्यामुळे रोहित या सामन्यात यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले.

रोहित जेव्हा फॉर्मात नव्हता तेव्हा त्याला फक्त एकच सल्ला दिला जात होता. रोहितला जर यापुढे मोठी खेळी साकारायची असेल आणि फलंदाजीत सातत्य ठेवायचे असेल तर त्याला आपली जुनीच आणि नैर्सगीक शैलीच कायम ठेवावी लागेल, असे म्हटले जात होते. रोहितने आजच्या सामन्यात हे करून दाखवले आणि त्यामुळेच त्याला आज मोठी खेळी साकारता आली.

आशिया चषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ७२ धावा केल्या होत्या. पण अन्य आठ डावांमध्ये मात्र त्याला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. रोहित हा सध्या फक्त ट्वेन्टी-२० सामन्यांवर लक्ष केंद्रीत करून आहे. पण गेल्या १० ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये रोहितला २६९ धावा करता आल्या होत्या. यावेळी त्याची सरासरी ही प्रत्येक सामन्याला जवळपास २७ एवढी आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये रोहितची बॅट तळपली नव्हती. पण या सामन्यात मात्र रोहितने धमाकेदार फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.