नवी दिल्ली : भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत पराभव झाला. भारतीय संघाला फक्त ११७ धावाच करता आल्या आणि त्यांना ऑस्ट्रेलियाची एकही विकेट मिळवता आली नाही. भारतासाठी हा पराभव म्हणजे मोठा धक्का होता. पण या पराभवानंतर रोहित शर्मा जे म्हणाला त्याने चाहत्यांना अजून एक धक्का बसला आहे.

रोहित शर्माने हा पहिल्या वनडेत खेळू शकला नव्हता. पहिल्या वनडेत भारताला विजय मिळवता आला होता. रोहितने दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात पुनरागमन केले आणि त्यांचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. भारतासाठी हा एक मोठा पराभव आहे. या पराभवाची कोणतीही कारणं रोहित शर्माने देऊ नयेत, कारण भारताचे वस्त्रहरण हे सर्वांनी पाहिले आहे. पण सामना संपल्यावर रोहित जे काही म्हणाला ते पचनी पडू शकत नाही.

रोहित शर्मा सामना संपल्यावर म्हणाला की, ” भारताची फलंदाजी संपली, आम्ही फलंदाजीत अपयशी ठरलो. आम्हाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही गोलंदाजीला उतरत होतो तेव्हा आम्हाला माहिती होते की, हा सामना आम्ही जिंकू शकत नाही.” रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार आहे. एखादा कर्णधार कसा नसावा, याचे हे उदाहरण देता येऊ शकते. कारण परिस्थिती कशीही असो कर्णधाराने खेळाडूंना आशा दाखवायची असेल. पण त्याचबरोबर प्रयत्न करणेही महत्वाचे असते. गोलंदाजीला उतरण्यापूर्वीच रोहित शर्माने गुडघे टेकले होते. पण जर रोहितच्या जागी दुसरा कर्णधार असला असता तर त्याची मानसीकता वेगळी असली असती. पराभव हा पहिल्यांदा मानसीकतेने होतो. रोहितने गोलंदाजीला उतरण्यापूर्वीच पराभवाची मानसीकता बनवली होती. भारताचे आव्हान कमी होते, हे मान्य आहे. पण सुरुवातीपासूनच सामना सोडून देणे हे कितपत योग्य आहे. यापूर्वी कोणताही संघ १०० धावांच्या आत बाद झाला नाही का, हे रोहित विसरला. त्यामुळे रोहितची मानसीकता होती ती सामन्यात दिसली. जर रोहितने ऑस्ट्रेलियाच्या २-३ विकेट्स झटपट मिळवण्याचा विचार केला असता तर तो संघात भिनलेला पाहायला मिळाला असता. पण जिथे कर्णधारानेच हार मानली तिथे खेळाडू तरी काय करणार, पण रोहितने ही गोष्ट बदलली तर त्याच्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *