रोहित पवारांच्या मतदारसंघात येणार रोहित शर्मा:भव्य स्टेडियमचे होणार भूमिपूजन, अकॅडेमीचा ग्रामीण भागातील खेळाडूंना फायदा

रोहित पवारांच्या मतदारसंघात येणार रोहित शर्मा:भव्य स्टेडियमचे होणार भूमिपूजन, अकॅडेमीचा ग्रामीण भागातील खेळाडूंना फायदा

आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमचे उद्घाटन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे आता मतदारसंघातील युवा खेळाडूंसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. यावेळी रोहित पवारांनी कर्जतमध्येही मोठे स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली आहे. घटस्थापनेच्या दिवशीच आणि आई जगदंबा मातेचे वास्तव्य असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील राशीनच्या पवित्र भूमीत भारताला विश्वचषक मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आपण क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करणार आहोत, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर शेअर केली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, मी स्वतः रोहित शर्माचा फॅन आहे. त्यांच्या अकॅडेमीच्या मदतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. रोहित शर्मा यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांची अकॅडेमी इथे सुरू करत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडेमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे. तसेच कर्जत येथे देखील स्टेडियम होत आहे, येथे रणजी सामने होतील असा आमचा मानस असल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे पण ग्राउंड उभे करण्यात येणार आहे, हे सर्व काम सीएसआर फंडातून होणार आहे. येथील अकॅडेमीमध्ये होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रिकेट, कुस्ती आणि उरलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, तर कर्जत येथील स्टेडियमला येथील स्थानिकांना विचारून नाव ठरवण्यात येणार आहे. या स्टेडियमचा फायदा कर्जत मतदारसंघ व अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना होईल, असा विश्वास रोहित शर्मा यांनी व्यक्त केला आहे. निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, सध्या राज्यात शरद पवार साहेब फिरत आहेत, महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण आहे. बरेचजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, मात्र पहिल्यांदा निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल. काही लोक चर्चेमुळे नाराज असतील, त्यांनी उगाच नाराज होऊ नये, शेवटी पवार साहेब जो निर्णय घेतील तो काहीतरी विचार करूनच घेतील. तो निर्णय घेताना साहेब निष्ठावंतांना नाराज करणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब आठवतंय का? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते, पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका… अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की, या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही.

​आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमचे उद्घाटन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे आता मतदारसंघातील युवा खेळाडूंसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. यावेळी रोहित पवारांनी कर्जतमध्येही मोठे स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली आहे. घटस्थापनेच्या दिवशीच आणि आई जगदंबा मातेचे वास्तव्य असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील राशीनच्या पवित्र भूमीत भारताला विश्वचषक मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आपण क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करणार आहोत, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर शेअर केली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, मी स्वतः रोहित शर्माचा फॅन आहे. त्यांच्या अकॅडेमीच्या मदतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. रोहित शर्मा यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांची अकॅडेमी इथे सुरू करत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडेमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे. तसेच कर्जत येथे देखील स्टेडियम होत आहे, येथे रणजी सामने होतील असा आमचा मानस असल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे पण ग्राउंड उभे करण्यात येणार आहे, हे सर्व काम सीएसआर फंडातून होणार आहे. येथील अकॅडेमीमध्ये होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रिकेट, कुस्ती आणि उरलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, तर कर्जत येथील स्टेडियमला येथील स्थानिकांना विचारून नाव ठरवण्यात येणार आहे. या स्टेडियमचा फायदा कर्जत मतदारसंघ व अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना होईल, असा विश्वास रोहित शर्मा यांनी व्यक्त केला आहे. निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, सध्या राज्यात शरद पवार साहेब फिरत आहेत, महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण आहे. बरेचजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, मात्र पहिल्यांदा निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल. काही लोक चर्चेमुळे नाराज असतील, त्यांनी उगाच नाराज होऊ नये, शेवटी पवार साहेब जो निर्णय घेतील तो काहीतरी विचार करूनच घेतील. तो निर्णय घेताना साहेब निष्ठावंतांना नाराज करणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब आठवतंय का? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते, पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका… अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की, या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment