बेंगळुरू: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे वर्ल्डकपमधील अखेरची साखळी लढत नेदरलँड्सविरुद्ध उद्या १२ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे खेळणार आहे. सुरुवातीच्या ८ पैकी ८ लढतीत विजय मिळून सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. आता साखळी फेरीतील सर्व लढती जिंकून टीम इंडिया १०० टक्के विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. नेदरलँड्सपेक्षा भारताचा संघ वरचढ असून या लढतीत रोहित सेना बाजी मारेल यात कोणतीही शंका वाटत नाही.

नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीच्या निकालाने भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळेच या लढतीत टीम इंडिया काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. पण ही लढत भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी स्पेशल असणार आहे. या मॅचमध्ये रोहितला एक दोन नव्हे तर ७ मोठे विक्रम करण्याची सुवर्ण संधी आहे.

१) रोहितने या कॅलेंडरवर्षातील २४ वनडे सामन्यात ५८ षटकार मारले आहेत. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. जर नेदरलँड्सविरुद्ध रोहितने एक षटकार जरी मारला तरी तो हा विक्रम स्वत:च्या नावावर करू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने २०१५ या कॅलेंडर वर्षात २० वनडेत ५८ षटकार मारले होते.

वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा गाशा गुंडाळला; सेमीफायनलचे ४ संघ ठरले, नॉकआउट लढतीचे संपूर्ण वेळापत्रक
२) हिटमॅन रोहितने २५ वर्ल्डकप सामन्यात ४५ षटकार मारले आहेत. जर त्याने रविवारी अजून ५ षटकार मारले तर तो वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करेल. सध्या हा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने वर्ल्डकप स्पर्धेत मिळून ४९ षटकार मारलेत.

३) वर्ल्डकप २०२३ मध्ये रोहितने आतापर्यंत ४४२ धावा केल्या आहेत. अजून ५८ धावा केल्यास रोहितच्या ५०० धावा होतील. असे केल्यात वर्ल्डकप स्पर्धेत दोन वळा ५००हून अधिक धावा करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा फलंदाज होईल. सचिनने १९९६च्या स्पर्धेत ५२३ आणि २००३ साली ६७३ धावा केल्या होत्या. तर रोहितने २०१९ साली ६४८ धावा केल्या होत्या.

टाइम आउट प्रकरणी बांगलादेशला बसला मोठा झटका; कोचने वर्ल्डकप संपण्याआधीच सांगितले- मला तुमच्या सोबत…
४) वर्ल्डकपमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. गांगुलीने २००३च्या स्पर्धेत ११ सामन्यात ४६५ धावा केल्या होत्या. आता रोहितच्या ४४२ धावा झाल्या आहेत. जर त्याने २४ धावा केल्या तर गांगुलीचा विक्रम मागे टाकू शकतो.

५) रविवारी भारताने नेदरलँड्सचा पराभव केला तर एका वर्ल्डकप स्पर्धेत सलग ९ मॅच जिंकणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार होईल. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील रिकी पॉन्टिंगनंतरचा दुसरा कर्णधार असेल. गांगुलीने २००३च्या स्पर्धेत सलग ८ मॅच जिंकल्या होत्या.

क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच कोणी घेतला नाही; वर्ल्डकप राहिला बाजूला चर्चा फक्त एका व्हिडिओची
६) रोहितला वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने १ हजार ५०० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्यासाठी नेदरलँड्सविरुद्ध रोहितला ८० धावा कराव्या लागतील. आतापर्यंत अशी कामगिरी फक्त ४ फलंदाजांनी केली आहे. रविवारच्या लढतीत रोहितने हा टप्पा गाठल्यास तो २६ डावात १ हजार ५०० धावा पूर्ण करेल.

७) रविवारी रोहितने जर शतकी खेळी केली तर तो रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकरनंतरचा तिसरा फलंदाज ठरले ज्याने वनडेतील ११ संघांविरुद्ध शतक झळकावले.

८) सलामीवीर म्हणून वनडे करिअरमधील १४ हजार धावांचा टप्पा पार करण्यास रोहितला फक्त १४ धावांची गरज आहे.

Read Latest Sports News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *