कोलंबो: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५० धावांनी धुव्वा उडवला आणि १० गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारत आठव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने प्राणघातक गोलंदाजी करत ७ षटकांत श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजने ऐतिहासिक स्पेल टाकत एका षटकात त्याने ४ विकेट्स मिळवल्या, त्याच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेचे पार कंबरडे मोडले. सिराजला अधिक षटके टाकण्याची संधी मिळाली असती तर कदाचित तो ७ विकेट घेऊ शकला असता, पण कर्णधार रोहित शर्माने त्याला रोखले. पण रोहित शर्माने सिराज का रोखले यामागचे नेमके कारण काय होते; हे त्याने स्वतः सामन्यानंतर सांगितले.
आशिया कप फायनलमध्ये मोहम्मद सिराजने सहावे षटक पूर्ण केल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा थर्ड-मॅनच्या गोलंदाजाकडे गेला, त्याच्याशी संभाषण केले आणि सिराजला दुसरे षटक टाकण्यापासून रोखले. रोहित शर्मा म्हणाला, “त्या स्पेलमध्ये सिराजने सात षटके टाकली आणि सात षटके खूप आहेत, त्यामुळे मला ट्रेनरकडून मेसेज आला की आपण त्याला आता थांबवायला हवे.”
रोहित म्हणाला, “सिराज गोलंदाजीसाठी खूप उत्सुक होता. हा कोणत्याही फलंदाजाचा किंवा गोलंदाजाचा स्वभाव असतो, त्याला संधी दिसताच त्याचा फायदा घ्यायचा असतो. कर्णधार म्हणून इथेच माझा उपयोग होतो. प्रत्येकजण थोडा शांत राहो आणि तुम्ही स्वत:वर जास्त जोर नाही देत आहात ना, या गोष्टींची मी खात्री करत असतो.”
रोहित शर्माने सिराजच्या कामगिरीचे खूप कौतुक केले. रोहित म्हणाला, “स्लिपमधून पाहणे खूप आनंददायी होते. इतर दोघांच्या तुलनेत सिराजने चेंडूला अधिक मूव्ह केला. हे अवलंबून आहे, तुम्हाला माहिती आहे, दररोज प्रत्येकजण हिरो होऊ शकत नाही. हा खेळ खूप चांगला आहे कारण दररोज एक वेगळा हिरो आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा तो (सिराज) स्पेल टाकत होता तेव्हा आम्ही सगळे त्याच्या पाठीशी होतो. आम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा दिला.”