मुंबई: आशिया कपमधील सुपर फोर सामन्यांपासून भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच संघामध्ये दुखापतींचे सत्र सुरूच आहे. आशिया कपच्या सुरूवातीला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोघे दुखापतींमुळे संघाबाहेर होते. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात संघाची गोलंदाजी बाजू थोडीफार ढासळली होती. तर त्याचसोबत संघाबाबत अनेक विविध प्रयोग देखील करण्यात येत होते. आशिय कप सामन्यांदरम्यान प्रत्येक सामन्यात संघात बादल केले जात होते. काही बदल हे इतके अनपेक्षित होते की, अनेकांनी यावर भाष्य देखील केले. तर आता आगामी विश्वचषकासाठी देखील अर्धाअधिक संघ हा आशिया कपचा आहे.

येत्या विश्वचषकासाठी संघापुढे मोठे आव्हान आहे ते म्हणजे संघासाठीचा एक्स फॅक्टर शोधणे, जो संघासाठी सर्वच गोष्टींमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावेल. भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा हा आशिया कपदरम्यान दुखापत झाल्याने संघाबाहेर गेला. त्यामुळे त्याची जागा भरून काढणे हे संघासमोर मोठे आव्हान आहे.

रोहित-राहुलच्या हट्टामुळे टीम इंडियाला बसतोय फटका, या प्रयोगांमुळे वर्ल्डकप जिंकणार तरी कसा?

जाडेजाने आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याला साथ देत दमदार फलंदाजी केली होती आणि संघाला धावांचा डोंगर उभारण्यात मदत केली होती. तर त्याचबरोबर संघासाठी काही षटके देखील टाकली होती. पण त्यानंतर त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो संघाचा भाग नव्हता. त्याच्या अनुपस्थितीचा भारताला खूप मोठा फटका सहन करावा लागला आहे. सुपर फोर सामन्यांमध्ये भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये देखील त्याची उणीव भासली.

निवृत्तीनंतर काय करणार रॉजर फेडरर, केला मोठा खुलासा; देशासाठी करणार हे काम

रवींद्र जाडेजाने त्याच्या अनुभवाच्या जोरावर भारतीय संघात तसेच आयपीएलमध्ये आपली उत्कृष्ट खेळी कायमच दाखवली आहे. रवींद्र जाडेजचा अनुपस्थितीत अक्षर पटेलचा संघात समावेश केला. इतर ही खेळाडूंना संघात सामील केले, परंतु जाडेजाची जागा भरून निघल्याचे अद्याप दिसत नाही आहे. भारताची कामगिरी अजून खराब होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारून ही भारताला पराभव पत्करावा लागला.

भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यावर मोठं संकट, मॅच खेळवण्यासाठी लाईटचं नाही

संघामध्ये खेळताना उत्तम खेळीसोबत अनुभवाची सोबत देखील लागते आणि संघात सीनियर खेळाडू असल्याने संघ अधिक मजबूत होतो. त्यामुळे टी-२० विश्वचषकासाठी एक्स फॅक्टर शोधणं अधिक गरजेचं आहे, यावर दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ‘याचा अर्थ असा आहे की एक फलंदाजी युनिट म्हणून तुम्हाला प्रत्येक सामन्यात १५-२० धावा अधिक कराव्या लागतील, कारण तुम्ही संघामध्ये पाहिले तर प्रतिभा कुठे आहे? जडेजा संघात नाही. मग तो एक्स-फॅक्टर कुठे आहे?’

शिखर धवनने शेअर केला संतापजनक घटनेचा व्हिडिओ; कबड्डी खेळाडूंना शौचालयात दि

आता विश्वचषकासाठी भारतीय संघात तो महत्त्वाचा एक्स फॅक्टर कोण असणार आणि भारतीय संघाची कामगिरी कशी सुधारणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.