आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर:विविध मागण्यांसाठी आरटीओ दालनासमोर निदर्शने
राज्य मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभागातील सर्व 100% कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी वाहनांचे हस्तातंरण, कर्ज प्रकरणे, नोंदी, शुल्क वसुली आदी कामे पूर्णपणे ठप्प होती. कार्यालयीन कामाजाचा खोळंबा झाला होता. यामुळे वाहन चालक मालकांची प्रचंड गैरसोय झाली. तसेच ७० टक्के महसुल देखील बुडाला आहे. आकृतीबंधाची अंमलबजावणी करा. आकृतीबंधानुसार तात्काळ पदोन्नती द्यावी. सेवा प्रवेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, जाचक अटी रद्द कराव्यात. समायोजन रद्द करावे. महसूली बदल्या रद्द कराव्यात. कळसकर समितीची सुधारीत अंमलबजावणी व्हावी. या प्रमुख मागण्यांसाठी राज्य मोटार वाहन विभागातील १६०० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सरकारकडे वारंवार मागणी करूनही मागण्यांची पूर्तता होत नाही. याचा निषेध नोंदवण्यासाठी आरटीओतील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आरटीओच्या दालनासमोरच निदर्शने आंदोलन देखील केले. आमच्या मागण्या मान्य करा, जाचक अटी रद्द करा, महसूल बदल्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशा घोषणा संपातील कर्मचाऱ्यांनी देऊन सर्वांचे लक्ष वेधले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती कर्माऱ्यांनी दिली. यांचा बेमुदत आंदोलनाला पाठिंबा कार्यकारी अधिकारी संघटना (राजपत्रित अधिकारी) मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यातील मोटार परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जो संप पुकारला आहे तो न्याय तत्वावर असून त्याला पाठिंबा दिला आहे. तसे पत्र त्यांनी संपकारी कर्मचारी संघटनेला व शासन आणि परिवहन प्रशासनालाही दिले आहे.