[ad_1]

नांदेड: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून सबंध राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्याचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला. परंतु तरुणांच्या मनात अजूनही राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. यातच पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दाजीबा रामदास कदम (वय २३) असं तरुणाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील हा चौथा बळी ठरला आहे.नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे दाजीबा कदम याने शनिवारी दुपारी विष घेतले होते. तिथेच तो बेशुद्ध अवस्थेत पडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा रविवार १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुजोर प्रशासनाला असे किती बळी हवेत? असा संतप्त सवाल मराठा समाजाने केला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दाजीबा कदम याचं बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे. अनेक वेळा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले, पण आरक्षण विना मला नोकरी मिळत नाहीये. एक मराठा लाख मराठा असं चिठ्ठीत लिहीत त्याने आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी आता पर्यंत ५२ हुन अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. त्यातच नांदेडमध्ये यापूर्वी सुदर्शन देवराये, ओमकार बावणे, शुभम पवार आदिनी आपले जीवन संपवले आहे. दरम्यान या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मुलाच्या निर्णयाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगररामदास कदम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. दिड एकर शेतीवर ते उपजीविका भागवत असतात. त्यांचा मुलगा दाजीबा हा बारावी उत्तीर्ण असून तो शासकीय नोकरीच्या शोधात होता. मात्र आरक्षणा विना त्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दरम्यान दिवाळी सनाचा उत्साह असताना मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.Read And

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *