भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही:भगव्या रंगासोबत येण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्यासोबत यावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही:भगव्या रंगासोबत येण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्यासोबत यावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य हे होळीनिमित्त केले आहे. प्रत्येक जण होळीचा आनंद घेत असतात. आमचा रंग भगवा आहे, ज्याला हा रंग आवडेल त्यांनी सोबत यावे. हा हिंदुत्वाचा वैश्विक रंग आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवा रंग हा हिंदुत्त्वाचा आहे. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. सोबत घेऊन चालणारा आहे. ज्यांना भगव्या रंगासोबत यावे वाटत आहे. त्यांनी आमच्या सोबत यावे. जयंत पाटलांचा अंदाज लावणे कठीण एकनाथ शिंदे म्हणाले की, जयंत पाटील हे परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राजकारणामध्ये काम केले आहे. त्यांचा अंदाज लावणे कठीण आहे. विरोधी पक्षात लोकं कमी असले तरी त्यांना आम्ही कमी लेखत नाही. विरोधकांना कमजोर समजत नाही. दुश्मन भी दुश्मन के गले लगता है एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह जोरात आहे. या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुलिवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत. आनंद घेत आहे. या सणात मित्र-मित्राला भेटतात परंतू दुश्मन भी दुश्मन के गले लग जाता है. महायुतीकडून सप्तरंग उधळण्याचे काम एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनांमध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचे काम करत आहोत. असेच पुढे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आम्ही काम करणार आहोत. लोकांनी आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे. हे डबल इंजिन सरकार लोकांसाठी काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला पुढे घेऊन जात आहे. खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे नाव वाढवण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment