मुंबई- स्टँडअप कॉमेडीच्या स्टेजवरून पोट धरून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं नाव विनोदवीर म्हणून लोकप्रिय झालं. पण कॉमेडियन म्हणून यशस्वी होण्याबरोबरच राजू श्रीवास्तव यांनी बॉलिवूडमध्ये ११७ सिनेमांमधून अभिनयाचीही झलक दाखवली आहे. राजू यांनी १९८८ ला त्यांचा बॉलिवूडमधला प्रवास सुरू केला आणि २०१७ पर्यंत राजू हे कॉमेडी आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे काम करत होते. पण हा प्रवास आता पूर्णपणे थांबला. शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या विनोदवीराची झुंज थांबली. पडद्यावरचा ‘गजोधर भैय्या’ आता कायमचा शांत झाला.

राजू श्रीवास्तवांचा मृत्यू कसा झाला, सगळं ठीक होताना अचानक काय झालं?

१९८८ चा काळ हा बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमाचा काळ होता. सिनेमाचा हिरो कोण आहे यावर सिनेमा चालायचा. नायकाचे डॅशिंग स्टंट, त्याची स्टाइल पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमाकडे खेचले जात होते. अशा काळात एक सामान्य चेहरा असलेल्या राजू श्रीवास्तव यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तेजाब या अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित अभिनित गाजलेल्या सिनेमात राजू यांनी छोटाशीच भूमिका केली आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. ‘तेजाब’ हाच राजू यांचा पहिला सिनेमा.


राजू यांची स्टँडअप कॉमेडी सुरूच होती पण ते मोठ्या पडद्यावरील भूमिकांच्याही शोधात होते. तेजाबनंतर पुढच्याच वर्षी आलेल्या मैने प्यार किया या सिनेमात राजू यांची वर्णी लागली. मैने प्यार किया सिनेमाही गाजला आणि राजू यांची भूमिकाही. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये राजू यांनी भूमिका केल्या. काही भूमिका विनोदी धाटणीच्या होत्या तर काही चरित्रात्मक भूमिका होत्या. राजू यांच्या डायलॉगबाजीमुळे त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

कोमात गेल्यावर काय होतं, काहीसे असे होते राजू यांचे शेवटचे दिवस

आमदनी अठन्नी खर्चा रूपया सिनेमात राजू यांनी बाबा चिन चिन चू ही गुंडाची भूमिका केली होती जी आठवली तर आजही प्रेक्षक खळखळून हसतात. भावनाओंको समझो या सिनेमातील राजू यांनी केलेली दया ही भूमिकाही गाजली. या सिनेमातील त्यांचा स्मशानातील सीन भरपूर मनोरंजन करणारा ठरला होता. बिग ब्रदर सिनेमातील राजू यांनी केलेला रिक्षा ड्रायव्हर या भूमिकेला असलेला विनोदी टच चाहत्यांना खूप आवडला.


बाँबे टू गोवा सिनेमातील राजू यांची वॉर्डबॉयची भूमिकाही खूप गाजली. बाजीगर आणि मै प्रेम की दिवानी हू या सिनेमातील राजू यांनी केलेल्या भूमिका त्यांच्या महत्वाच्या ठरल्या. ए यादव, संकठा, गजोधर, बिरजू, ई ट्रेन अपना छूटा की बाजूवाला हा राजू यांच डायलॉग खूपच फेमस झाला. या डायलॉगवर सोशल मीडियावर अनेकजणांनी रिल्सही केले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.