हिंगोली: हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या पळशी गावातील तरुण शेतकऱ्याने हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्र लिहून पूर्ण कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी केली आहे. यामुळे तरुणाच्या या पत्राने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पंडित पांडुरंग खिल्लारे असे या तरुणाचे नाव असून, पळशी गावचा रहिवासी आहे.

अनेक वर्षापासून पावसामुळे आणि नापिकी, अतिवृष्टी यामुळे सावकारी कर्ज, बँक कर्ज व शासनाच्या धोरणामुळे मी अत्यंत वाईट व हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. एक जुलै २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये संततधार पावसामुळे माझी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. यातच माझ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे माझ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासनाने राजकीय द्वेषापोटी आमची काही मंडळे दुष्काळी अनुदानापासून वंचित ठेवली आहे. यामुळे आमच्या शेतकऱ्यावर खूपच अन्याय झाला आहे.

वाचा- पालिकेनं आम्हाला कोर्टात येण्यास भाग पाडलं; दसरा मेळाव्याच्या प्रश्नावर शिवसेनेचे गंभीर आरोप

आतापर्यंत शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे तर सोडाच पण कोणतेही कर्मचारी अधिकारी फिरकले सुद्धा नाही. अशा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाची अनास्थांत व भेदभाव जन्य भूमिका असेल तर कृपया मला व माझ्या परिवाराला शासनाने इच्छा मरणाची परवानगी द्यावी ही मी कळकळीची विनंती करतो शिवाय माझ्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असे या तरुणाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वाचा- जसप्रीत बुमराह कधी खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर आली मोठी अपडेट

ओल्या दुष्काळाच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमण झाल्याचे बघायला मिळते आहे. विविध स्तरावर आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर काय तोडगा निघणार,राज्याचे मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेणार याकडे राज्यातील संबंध शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.