म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांसाठी रस्सीखेच चालली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मेळावा झाल्यानंतर शरद पवार यांचा संदेश घेऊन त्यांचे नातू व अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार आज बुधवारी येत आहेत.

‘घेऊन येतो आहे, साहेबांचा संदेश’ असे अभियान आमदार रोहित पवार यांनी सुरू केले. त्यांच्यासोबत आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांनी कंत्राटी भरतीवरून काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे काका-पुतण्या आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची वस्तुस्थिती आणि आगामी काळातील वाटचाल, यावर ते भूमिका स्पष्ट करून पदाधिकाऱ्यांना विश्वास देतील.

ज्यांच्यामुळे राजकारणात आलो त्यांच्याविषयी बोलू नये; रुपाली चाकणकरांचा रोहित पवारांना सल्ला

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून रोहित पवार यांचा दौरा प्रारंभ झाला आहे. आज, बुधवारी त्यांचे आगमन झाल्यानंतर ते दीक्षाभूमी, गणेश टेकडीचे दर्शन घेतील. यानंतर पिवळी मारबत उत्सव मंडळास भेट देतील. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सायंकाळी समविचारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. रात्री ते ताजबागचे दर्शन घेतील, असे सलिल देशमुख यांनी सांगितले.

सिव्हिल लाइन्समधील स्वागत लॉनमध्ये बैठकांचे सत्र चालेल. विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि सर्व आघाड्यांचे प्रमुख उपस्थित राहतील, असेही सलिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil: वडिलांसमोर कसलेल्या पैलवानाचं खडतर आव्हान, आंबेगावात वळसे-पाटलांची लेक मैदानात उतरलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *