नगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला प्रतिसाद:आमदार नीतेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी
सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी नगर शहरात रविवारी दुपारी ‘सकल हिंदू समाज’ वतीने आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून मोर्चा काढण्यात आला. नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा सुरू झाला. भगवे झेंडे नाचवत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. माळीवाडा वेस- पंचवीस चावडी- चौपाटी कारंजा- कापड बाजार, चितळे रस्ता मार्गे दिल्लीगेट येथे आला. या मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथील सभेने झाला. फडणवीस हिंदूहित संरक्षक, इतरांचे हिंदुत्व चायनिज मॉडेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदूहित संरक्षक आहेत. बाकीच्यांचे हिंदुत्व हे ‘चायनीज मॉडेल’ आहे, अशी टीका आ. नितेश राणे यांनी केली. हा देश हिंदूंचा असल्याने हिंदू हिताची भाषा केली जाणार. जी काही मस्ती करायची ती बांगलादेश, पाकिस्तानात जाऊन करा. महंतांचे समर्थन करणारे स्टेटस’ ठेवणाऱ्यांना मारहाण होते. यासाठी हिंदूंचा दरारा व धाक निर्माण करण्याची गरज आहे. समाज माध्यमांवरून धमक्या देत आहेत, असे चॅनेल बंद करा, अशी मागणी आ. राणे यांनी केली. आमदार नीतेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी आ. नीतेश राणे यांनी दिल्ली गेट येथे मुस्लिम समाजाविरोधात गलिच्छ भाषेत व दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. राणे हे शहरात आल्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत. नगर येथील मुस्लिम समाजातील युवकांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे शहरात वातावरण दूषित होत आहे. पोलिसांनी राणे यांच्यासह रॅलीचे आयोजक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने पोलिस अधीक्षकांकडे केली. राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढण्यात आल्यानंतर मुस्लिम समाजातर्फे सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन दिले.