[ad_1]

मुंबई- सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ सिनेमा २०२१ मध्ये रिलीज झाला होता. आता दोन वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. ‘अंतिम’ सिनेमा मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक होता. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शक केलं होतं. आता त्यांनी सलमानच्या रिेमेकवर भाष्य केलं आहे. ‘बोल भिडू’ या चॅट शोमध्ये प्रवीण तरडेने अंतिम सिनेमावर राग व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली.

प्रवीण म्हणाले की, ‘मुळसी पॅटर्न’ पाहिल्यानंतर सलमानने माझे कौतुक केले. किती मस्त चित्रपट आहे असंही तो म्हणाला होता. पण जेव्हा त्याने रिमेक करायला सुरुवात केली तेव्हा त्याने सगळंच बदलून टाकलं होतं. महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सुरुवातीला या चित्रपटाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. पण माझ्यावर इतक्या गोष्टी लादल्या गेल्या आणि फेरफार केले गेले की मला चित्रपट सोडावा लागला. त्यानंतर माझा त्या सिनेमाशी काही संबंध नव्हता. पण आता मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, ‘अंतिम’ नावाचा तो चित्रपट मी आजपर्यंत पाहिला नाही. पण त्या सिनेमापेक्षा मुळशी पॅटर्न हा चित्रपट चांगला असल्याचं लोकांनी सांगितलं.

उपेंद्र लिमये यांनीही केला याचाच पुनरुच्चार

अभिनेते उपेंद्र लिमये यांनी मुळशी पॅटर्न आणि अंतिम: द फायनल ट्रुथ या दोन्ही चित्रपटात काम केले होते. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘याविषयी फार काही बोलायचे नसून, मराठी सिनेमा फार प्रामाणिकपणे बनवला होता. हिंदी रिमेकसाठी मुळशी पॅटर्न सिनेमाची जशीच्या तशी कॉपी जरी केली असती तरी हिंदी सिनेमा चांगला झाला असता,’ असे ते म्हणाले.

प्रवीण तरडेंनी सलमान खानच्या राधेमध्ये केलंय काम

प्रवीण तरडे सलमान खानच्या राधेमध्ये दिसले होते. त्यांनी एका गुंडाची भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या तीनही माध्यमांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे.

‘वेड’च्या टेलिव्हिजन प्रिमिअरपूर्वी अनोखा विक्रम, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *