आता भरवसा राहिला नाही…
कंपनीच्या म्हणण्यानुसार बोर्डाने सॅम ऑल्टमनच्या क्षमतेवरचा विश्वास गमावला असून कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, बोर्डाने चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर ऑल्टमनची हकालपट्टी केली. सॅम बोर्डासोबत झालेल्या संभाषणात स्पष्ट नव्हते असे कंपनीकडून सांगण्यात आले. तर OpenAI च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती सध्या ऑल्टमनच्या जागी अंतरिम सीईओ म्हणून काम पाहतील.
OpenAI अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमनही पायउतार
दरम्यान, सॅम ऑल्टमनच्या हकालपट्टीनंतर ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही कंपनी सोडली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की आठ वर्षांपूर्वी एका छोट्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे उभे केले त्याचा त्यांना अभिमान आहे. अशा परिस्थितीत ओपनएआयला एकामागोमाग दोन मोठे झटके बसले आहेत.
गेल्या वर्षीच आला चॅटबॉट
उल्लेखनीय आहे की ओपनएआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ChatGPT चॅटबॉट लाँच केले जे सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन बनले आहे. ChatGPT चॅटबॉट लाँच झाल्यानंतर जनरेटिव्ह AI ट्रेंड देखील सुरू करण्यात आले असून अतिशय कमी कालावधीत जगभर वेगाने पसरणाऱ्या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्सपैकी एक बनले. ३८ वर्षीय सॅम ऑल्टमन यांनी OpenAI चा सार्वजनिक चेहरा म्हणून काम केले असून मायक्रोसॉफ्टने OpenAI मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
ओपन एआय लीडर सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखाली चॅट जीपीटी एआय बॉट सादर केल्याने जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा अधिक तीव्र झाली. ओपन एआय लाँच करण्यात ऑल्टमॅनचा मोलाचा वाटा आहे.