समाजाचा पाऊण तास विरोध, तरीही जरांगे उपोषणावर ठाम:29 सप्टेंबरपासून आंतरवाली सराटीत सहावे उपोषण

२८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय मनाेज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आता पुन्हा उपोषण करू नका असे म्हणत समाजातील महिला-पुरुषांनी जवळपास पाऊण तास व्यासपीठासोर जाऊन त्यांना विरोध केला. परंतु जरांगे पाटील निर्णयावर ठाम राहिले. आता आर-पारची लढाई लढायची व फडणवीस यांची जिरवायची, असे सांगत त्यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले. आंतरवाली सराटी येथे त्यांनी आतापर्यंत पाच वेळा उपोषण केले असून हे त्यांचे सहावे उपोषण असेल.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. त्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आंतरवाली येथे मोठ्या संख्येने समाजबांधव गोळा झाले होते. या वेळी जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपण सरकारला २९ सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक, नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकार लाडक्या बहिणीला १५०० रुपये देत आहे तर भाच्याला व दाजीला काय देणार? आता दाजीच एक दिवस तुम्हाला अडवेल. आम्हाला कर्जमाफी, शेतीमालाला भाव, शेतीला पाणी, २४ तास वीजपुरवठा हवा आहे. आरक्षण मिळाल्यानंतर मराठे व धनगर मोठे होतील. आता फडणवीसांनी कितीही नॅरेटिव्ह पसरवले तरी काहीही फरक पडणार नाही, असेही मनोज जरांगे या वेळी बोलताना म्हणाले
फडणवीसांना जागा दाखवून देऊ मुंबईला जाऊन काही होणार नाही, गरज पडली तर जाऊ. तत्पूर्वी सगळा महाराष्ट्र आंतरवालीत बसेल. या निवडणुकीतही त्यांचे ११३ आमदार पाडू म्हणजे पाडूच. मी महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र फिरणार. मागील वर्षभरात अनेकांची कुटुंबे उघड्यावर पडली. लाखो पोरांवर गुन्हे दाखल झाले. कोटींनी मराठा समाज रस्त्यावर आहे. त्यामुळे २९ सप्टेंबरची लढाई आर-पारची होईल. मी बलिदान झालेल्या कुटुंबाचा बदला म्हणून देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून घेईन.
… तर भाजपला साफ करू मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झाला तर आगामी निवडणुकीत भाजपला साफ करून टाकू. ग्रामपंचायतीतही त्यांचा एकही सदस्य आम्ही निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दानवेंवरही साधला निशाणा या वेळी जरांगे पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवरही निशाणा साधला. मार्चमधील सभेत त्यांनी पोलिसांना सांगून आता माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्यानेच आम्हाला तशी माहिती दिली. मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो, पण आता त्यांनीच माझ्यावर केस केली. आता त्यांचे कुणी निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांना माझा कचका दाखवतो. मी लोकसभेत त्यांना पाडा म्हटलो असतो तर ते तीन लाख मतांनी पडले असते, असेही जरांगे पाटील म्हणाले.

​२८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय मनाेज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आता पुन्हा उपोषण करू नका असे म्हणत समाजातील महिला-पुरुषांनी जवळपास पाऊण तास व्यासपीठासोर जाऊन त्यांना विरोध केला. परंतु जरांगे पाटील निर्णयावर ठाम राहिले. आता आर-पारची लढाई लढायची व फडणवीस यांची जिरवायची, असे सांगत त्यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले. आंतरवाली सराटी येथे त्यांनी आतापर्यंत पाच वेळा उपोषण केले असून हे त्यांचे सहावे उपोषण असेल.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. त्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आंतरवाली येथे मोठ्या संख्येने समाजबांधव गोळा झाले होते. या वेळी जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपण सरकारला २९ सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक, नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकार लाडक्या बहिणीला १५०० रुपये देत आहे तर भाच्याला व दाजीला काय देणार? आता दाजीच एक दिवस तुम्हाला अडवेल. आम्हाला कर्जमाफी, शेतीमालाला भाव, शेतीला पाणी, २४ तास वीजपुरवठा हवा आहे. आरक्षण मिळाल्यानंतर मराठे व धनगर मोठे होतील. आता फडणवीसांनी कितीही नॅरेटिव्ह पसरवले तरी काहीही फरक पडणार नाही, असेही मनोज जरांगे या वेळी बोलताना म्हणाले
फडणवीसांना जागा दाखवून देऊ मुंबईला जाऊन काही होणार नाही, गरज पडली तर जाऊ. तत्पूर्वी सगळा महाराष्ट्र आंतरवालीत बसेल. या निवडणुकीतही त्यांचे ११३ आमदार पाडू म्हणजे पाडूच. मी महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र फिरणार. मागील वर्षभरात अनेकांची कुटुंबे उघड्यावर पडली. लाखो पोरांवर गुन्हे दाखल झाले. कोटींनी मराठा समाज रस्त्यावर आहे. त्यामुळे २९ सप्टेंबरची लढाई आर-पारची होईल. मी बलिदान झालेल्या कुटुंबाचा बदला म्हणून देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून घेईन.
… तर भाजपला साफ करू मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झाला तर आगामी निवडणुकीत भाजपला साफ करून टाकू. ग्रामपंचायतीतही त्यांचा एकही सदस्य आम्ही निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दानवेंवरही साधला निशाणा या वेळी जरांगे पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवरही निशाणा साधला. मार्चमधील सभेत त्यांनी पोलिसांना सांगून आता माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्यानेच आम्हाला तशी माहिती दिली. मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो, पण आता त्यांनीच माझ्यावर केस केली. आता त्यांचे कुणी निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांना माझा कचका दाखवतो. मी लोकसभेत त्यांना पाडा म्हटलो असतो तर ते तीन लाख मतांनी पडले असते, असेही जरांगे पाटील म्हणाले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment