बारामती: बारामतीच्या तृतीयपंथी श्रेया साळवे यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कायद्याची पदवी घेतली. मात्र, सराव करण्यासाठी नामवंत विधीज्ञ तज्ञांनी नकार दिल्याने सरावाशिवाय मी कशी वकील होणार ही चिंता साळवे यांना भेडसावत आहे. सराव करण्यासाठी मदत करण्यासाठी खरंच कोणी पुढे येईल का? असा सवाल त्यांनी केला आहे.

माळेगांव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना साळवे यांनी ही खंत व्यक्त केली आहे. मला समाजाकडून हीन आणि दुय्यम वागणूक मिळते. बारामती येथे वास्तव्य करणाऱ्या तृतीयपंथी श्रेया गोपाळ साळवे यांनी बारामती येथे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. ही पदवी घेतल्यानंतर नामवंत विधीज्ञ यांच्याकडे सराव केला जातो. सरावानंतरच वकिली व्यवसाय जोमाने करता येतो. मात्र, सध्या व्यवसाय नसल्याने हलाखीच्या परीस्थितीत जीवन जगावे लागत आहे. वेळप्रसंगी दुकान गाळ्यांमधून पैसे मागून चरितार्थ चालवावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, मग मैदानात नेऊन महिलेला संपवलं, परभणीत थरार

तृतीयपंथी असल्यानेच काही नामांकित विधीतज्ञांनी श्रेया यांना सराव करण्यासाठी नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. वकिली व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सराव हा महत्त्वाचा भाग आहे. चांगला विधीतज्ञ उत्तम सराव करुन घेतो. याचा फायदा नवीन पदवी घेणाऱ्याला होतो. त्याला स्वत:च्या व्यावसायासाठी याचा उपयोग होतो.

एकीकडे शासन तृतीयपंथीयांना सन्मान मिळावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. दुर्दैर्वाने समानतेच्या पोकळ गप्पा मारणारे तथाकथित लोक तृतीयपंथीयांना मात्र तशी वागणूक देत नाहीत. तिचं गत श्रेयाची असून कायद्याची पदवी घेऊन सुद्धा तिला सरावासाठी याच कायद्याचा उपयोग करावा लागणार आहे.

हेही वाचा –प्लॉटच्या व्यवहारात आईचा अडसर; पोटच्या पोरानं आईला संपवलं, परभणीतील हत्येचं गूढ उकललं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून मी कायद्याची पदवी घेतली. शिक्षण घेताना काहीच अडचण आली नाही. मात्र, सरावासाठी मी तृतीयपंथी असल्याने नकार मिळत असल्याने खंत वाटते. अशी माहिती अ‍ॅड. श्रेया साळवे यांनी दिली.

हेही वाचा –VIDEO: आईने मोबाईल हिसकावून घेतला, १५ वर्षांच्या मुलाचा पारा चढला, अख्खं घर उद्ध्वस्त केलं

गद्दारांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे, आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक समजा | उद्धव ठाकरेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.