सामंथाने तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे इंडस्ट्रीतून, अभिनयातून ब्रेक घेतला आहे. मागील वर्षी अभिनेत्रीने तिला ऑटो इम्यून डिसऑर्डर नावाचा आजार झाल्याचं सांगितलं. या आजारामुळे तिला मोठा त्रास सहन करावा लागला होता. अशात तिने आता सुट्टी काढून स्वत:साठी वेळ देण्याचं ठरवलं आणि काही काळासाठी ब्रेक घेतला आहे.
सामंथाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता ती राजकारणात करिअर करणारी असल्याची चर्चा आहे. काही रिपोर्ट्सनुसार ती आता राजकारणात येण्यासाठी तयार आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण इंडस्ट्रीतील ब्रेकनंतर ती राजकारणानंतर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याची ब्रँड ॲम्बेसेडर आहे सामंथा
सामंथाने नेहमीच शेतकऱ्यांसाठी समर्थन दिलं आहे. ती आधीपासून तेलंगानातील लोकांना आणि शेतकऱ्यांनी पाठिंबा देताना दिसली आहे. इतकंच नाही, तर सामंथा राज्यातील हँडलूम कपड्यांची ब्रँड ॲम्बेसेडर आहे.
या पार्टीत जाऊ शकते सामंथा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामंथा रुथ प्रभू, के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात BRS पार्टीशी जोडली जाऊ शकते. अद्याप सामंथा किंवा पार्टीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, सामंथाने १३ जुलै २०२३ रोजी ती इंडस्ट्रीतून ब्रेक घेत असल्याची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर तिचा खुशी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात ती विजय देवरकोंडासोबत स्क्रिन शेअर करताना दिसते आहे.