समरजित घाटगेंची हसन मुश्रीफांवर टीका:मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपदासाठी शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबतच्या नात्यांचा सौदा केला
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेला समरजीत घाटगे यांनी प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदासाठी नात्यांचा सौदा केला, असा घणाघाती आरोप केला आहे. कागल येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. समरजीत घाटगे म्हणाले की, शरद पवार साहेब हसन मुश्रीफ यांना आपल्या चिरंजीवाप्रमाणे वागणूक द्यायचे. सुप्रिया ताई त्यांना मोठ्या भावाप्रमाणे राखी बांधायच्या. एकेकाळी हे त्यांचे कुटुंब होते. पण त्यांनी ईडी आणि पालकमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्यासोबतच्या नात्यांचा सौदा केला. यामुळे त्यांना फस्ट्रेशन आले आहे. त्यांना झोप येत नाही. महाविकास आघाडीने मला मनापासून स्वीकारल्यामुळे ते माझ्याबद्दल अशा शब्दांत बोलतात. जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले यावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही घाटगे म्हणाले. खंडणीखोरपणा खपवून घेतlला जाणार नाही. पुढे बोलताना घाटगे म्हणाले की, कागल मतदारसंघातील सर्व एजंटगिरी आपल्याला बंद पडायची आहे. मतदारसंघात कोणत्याही प्रकारची एजंटगिरी, खंडणीखोरपणा खपवून घेतlला जाणार नाही. शासकीय योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या हातात जातील, असे नियोजन आपले सरकार आल्यावर करणार आहोत, असेही घाटगे म्हणाले. काय म्हणाले होते हसन मुश्रीफ? समरजित घाटगे यांनी पुण्यामध्ये कागल मतदारसंघातील नागरिकांसाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी ईडी कागलमध्ये पोहोचल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला समोर आली होती, अशी टीका केली होती. यानंतर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी पातळी सोडून त्या XXXखोर प्रवृत्तीच्या लोकांच्या मेळाव्याला जायचे नसते, असे म्हटले होते. हेही वाचा.. अमित शहांना मराठी माणूस मोठा झालेला खपत नाही:किरीट सोमय्या यांच्या डर्टी डझनपैकी 1 जण काल शहांसोबत दिसला -सुप्रिया सुळे किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सीरिज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत, हा एक मोठाच प्रश्न आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शहांसोबत बघितला, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सविस्तर बातमी वाचा..