संभाजीनगर, धुळे, हिंगोली, जळगावात 3 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज:मंत्रालयातील नियंत्रण कक्षाच्या वतीने सतर्क राहण्याचे आवाहन
येत्या 3 तासांत छत्रपती संभाजीनगर, धुळे, हिंगोली, जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मंत्रालयातील नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.