संभाजीनगरमध्ये 7 मे रोजी वादळी पावसाची शक्यता:मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’; विदर्भात मुसळधार

संभाजीनगरमध्ये 7 मे रोजी वादळी पावसाची शक्यता:मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’; विदर्भात मुसळधार

महाराष्ट्रात हवामान स्थिती आणि आगामी मान्सून बाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील हवामानाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू महिन्यात महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, काही भागांत वादळ आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आगामी मान्सून हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती तयारी ठेवावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या सूचना पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 मे दरम्यान तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी/ताशी वेगाने झंझावाती वारे होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 6 आणि 7 मे रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांसाठी सूचना मुंबई पुणे नागपूर नाशिक संभाजीनगर मुंबई व कोकण किनारपट्टी
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 6 आणि 7 मे रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी/ताशी वेगाने झंझावाती वारे वाहण्याची शक्यता आहे . विदर्भ व मराठवाडा नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही भागांत 5 ते 7 मे दरम्यान तुरळक ठिकाणी वादळ, वीजांचा कडकडाट आणि जोरदार वारे होण्याची शक्यता आहे . पुणे विभाग
पुण्यात 5 ते 9 मे दरम्यान दुपारी आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, 7 मेपासून वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . मान्सून 2025 च्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) : IMD च्या अंदाजानुसार, 2025 च्या मान्सून हंगामात देशभरात सरासरीच्या 105% पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल निनो स्थिती तटस्थ राहण्याची अपेक्षा असल्यामुळे मान्सूनला आधार मिळेल . स्कायमेट हवामान संस्था : स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) पावसाची तीव्रता अधिक असण्याची अपेक्षा आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment